Marathi Actress Swati Deval Told Incident Religious Conversion:मुंबईतील (Mumbai News) अंधेरी स्थानकातला (Andheri Railway Station) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video) झालेला. एका प्रवाशानं हा व्हिडीओ रेकॉर्ड केलेला, त्यात दावा करण्यात आलेला की, एका वृद्धाकडून तरुणीचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू होता. या व्हिडीओमुळे प्रचंड मोठा गदारोळ झालेला. त्यावेळी अनेकांनी असाच अनुभव आपल्याला आल्याचं सांगितलं होतं. अशातच आता एका मराठी अभिनेत्रीनं (Marathi Actress) एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तिनं तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेबाबत सांगितलंय. अभिनेत्रीनं जे काही सांगितलं, ते ऐकून खरंच पुरतं हादरून जायला होतं. 

Continues below advertisement

मराठी मनोरंजन विश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री स्वाती देवल (Swati Deval) हिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. बोरिवली (पश्चिम) येथील गजबजलेल्या इंद्रप्रस्थ आणि मोक्ष प्लाझा परिसरात खरेदीसाठी गेली असताना अभिनेत्रीसोबत एक विचित्र, पण तितकाच धक्कादायक प्रकार घडला, त्याबाबत तिनं सांगितलं आहे.  

अभिनेत्री स्वाती देवल हिनं काय सांगितलं? (Swati Deval Share Video)

अभिनेत्री स्वाती देवल इन्स्टावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हणाली की, "नमस्कार मी स्वाती देवल, मला एक गोष्ट सांगायची आहे. लहानपणी आपण शाळेत ऐकलं होतं, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत... खरोखरंच आपला देश असा आहे की, या देशात अनेक धर्म, जात आणि पंथाचे लोक राहतात. अगदी गुण्यागोविंदाने, एकत्र आणि प्रेमाने राहतात. पण असं आपल्याला वाटत होतं... आता बऱ्याच गोष्टी बदलायला लागल्या आहेत. टीव्हीवरील बातम्या, अनेक प्रसार माध्यमांमधून बऱ्याच गोष्टी कानावर येत असतात. वाईट कर्म करणारी लोक आपल्या आजूबाजूला आहेत, हे आपल्याला दिसत असतं... पण, या गोष्टी दुसरीकडे घडत असतात, आपल्यापर्यंत येत नाहीत, तोपर्यंत आपल्याला त्याची झळ पोहोचत नाही... पण माझ्याबरोबर एक घटना घडली..."

Continues below advertisement

"बोरिवली (पश्चिम) इथल्या इंद्रप्रस्थ आणि मोक्ष प्लाझा परिसरात मी खरेदीसाठी गेले होते. यावेळी एका अनोळखी तरुणीनं मला गाठलं. ती मला म्हणाली, मॅम मला तुमच्याशी बोलायचंय... अर्थात तिनं हे हिंदीत विचारलं. त्यावर मी तिला क्या? असं म्हटलं. तर ती म्हणाली, आपसे बायबल के बारें में बात करनी थी... क्या आप बायबल के बारें में जानना चाहोगे… मुझे आपसे बात करनी है. त्यावर मी तिला मुझे आपसे कुछ बात नही करनी... धन्यवाद... असं म्हटलं आणि मी तिथून निघून आले...", असं स्वाती देवल म्हणाली. 

पुढे बोलताना स्वाती देवल म्हणाली की, "मी तिथून पुढे गेले, तरी माझ्या डोक्यात विचार सुरू होता की, ही बाई अचानक असं का विचारतेय? चांगल्या घरातली मुलगी, साधारण 28-30 वयोगटातली... माझ्या डोक्यात सतत विचार सुरू होता की, का हिनं मलाच विचारलं? मी मागे वळून पाहिलं तर ती माझ्यावर लक्ष ठेवून होती आणि माझ्याच आसपास घिरट्या घालत होती... मी रागानं तिच्याकडे पाहिलं आणि रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला गेले..."

अत्यंत संशयित त्या दोन बायका... : स्वाती देवल 

"रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनं मी तिच्यावर गपचूप लक्ष ठेवायला सुरुवात केली. त्यावेळी मला असं दिसलं की, ती बाई तेवढ्या भागात फिरत होती. काही बायकांना थांबवून त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती. नंतर बऱ्याच वेळानं ती आणखी एका मुलीला भेटली... ती मुलगीसुद्धा अशीच सगळ्यांना भेटून येत होती... मग त्या दोघी एकमेकींशी बोलल्या, काहीतरी कानात कुजबुजल्या... अत्यंत संशयित त्या दोन बायका मला वाटल्या... माझं चुकलं की मी त्यांचा व्हिडीओ शूट केला नाही, मग माझ्या लक्षात आलं की, हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे..."

VIDEO शेअर करत स्वातीचं कळकळीचं आवाहन

आपल्यासोबत घडलेल्या प्रसंगाचा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्री स्वाती देवल हिनं एक कॅप्शन शेअर केलंय. या कॅप्शनमध्ये तिनं सर्वांना कळकळीचं आवाहन केलंय. तिनं लिहिलंय की, "सावधान, काळजी घ्या, फसू नका. अशा लोकांशी बोलू नका. तुम्ही तुमच्या मतांशी, विचारांशी, हिंदुत्वाशी आणि तुमच्या धर्माशी एकनिष्ठ राहा. तुम्ही आपले आहात म्हणून ही गोष्ट सांगितली. जय भवानी, जय शिवाजी!"

दरम्यान, अभिनेत्री स्वाती देवल ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत स्वाती देवलनं नेहाच्या (प्रार्थना बेहरे) हिनीची भूमिका साकारली होती. ग्रे शेड असलेली ही भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली. सध्या ती 'लक्ष्मी निवास' मालिकेत झळकतेय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Daniel Balaji Mother Leaves 80 Crore Bungalow: 'माझा मुलगाच जगात नाही, तर महाला काय कामाचा...'; सुपरस्टार लेकाच्या निधनानं आई खचली, 80 कोटींच्या बंगल्याचा त्याग करुन झोपडीत राहायला गेली