Sonali Kulkarni on Colourism: सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) सध्या 'द पॅराडाइज' या सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहेत. या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान, 'द पॅराडाइज' या सिनेमाला मिळत असलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर  संपूर्ण टीमने सक्सेस साजरा केला. पापाराझींसह केक कापून 'द पॅराडाइज' च्या टीमने आनंद साजरा केला.  माहितीनुसार, 'द पॅराडाइज' (The paradise) या चित्रपटात सोनाली कुलकर्णी हिने नानीच्या आई समक्का ही भूमिका साकारली. या भूमिकेचं सध्या विशेष कौतुक होत आहे. दरम्यान, अलिकडेच  तिने बॉलिवूड (Bollywood) बबलच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. सोनालीने या मुलाखतीत एक किस्सा शेअर केला. तिला त्वचेच्या रंगावरुन हिणवलं जात होतं,  असं तिने सांगितलं. त्यावेळी सोनाली खूप लहान होती.  नेमका किस्सा काय? जाणून घेऊयात.

Continues below advertisement

पहिल्या ऑडिशनमध्ये सोनाली कुलकर्णीला रंगावरुन ट्रोल करण्यात येत होतं (Sonali Kulkarni Reveals Being Mocked for Her Skin Colour)

'सावळ्या मुलींनी कॅमेरा फेसिंग रोल करु नये, असं सर्वांना वाटायचं', असं सोनाली कुलकर्णी मुलाखतीत म्हणाली.  आपल्या पहिल्या ऑडिशनचा किस्सा शेअर करताना अभिनेत्री म्हणाली की, 'कधी कधी माझ्या आजूबाजूची लोक खूप क्रूर असतात.  पुण्यात जेव्हा मी ऑडिशन देण्यासाठी गेले होते, तेव्हा एक महिला मला म्हणाली होती की, तू इथे का आली आहेस?  आपला चेहरा आरशात बघत जा,  सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाहीत', असं अभिनेत्रीने सांगितलं.  सोनाली या गोष्टीमुळे खूप हर्ट झाली होती.  तिला समजलं नाही की, तिच्या त्वचेच्या रंगाबद्दल असं का म्हटलं जात आहे.  

अभिनेत्री मुलाखतीत म्हणाली की, 'माझ्या कुटुंबाकडे फारसे पैसे नव्हते.  आमच्याकडे पैशांपेक्षा केवळ प्रेम होते. त्यामुळे मला कुणीतरी असं बोलल्यानंतर मला खूप अपमानित वाटायचं. मला तेथून पळून जावे असं वाटलं. माता सीतेप्रमाणे मला पृथ्वीने मिठीत घ्यावं, असं वाटलं', असं सोनाली कुलकर्णी म्हणाली.   काही वेळानंतर सोनाली कुलकर्णीची भेट गिरीश कर्नाड यांच्याशी झाली.   तेव्हा त्यांनी सोनालीला आपलं नाव विचारलं. तसेच तिच्या कामाविषयी जाणून घेतले.  सोनालीच्या कामाविषयी जाणून घेण्यात रस दाखवला. यामुळे अभिनेत्रीला चांगलं वाटलं. आधी ज्या महिलेनं सोनालीला त्वचेच्या रंगावरुन ट्रोल केलं, ती गोष्ट अभिनेत्री त्या क्षणासाठी विसरुन गेली होती. 

Continues below advertisement

या पॉडकास्टमध्ये सोनाली कुलकर्णीच्या सौंदर्यावरही चर्चा झाली.  तेव्हा अभिनेत्री म्हणाली की, 'आज मी हे मान्य करु शकते की, मी खूप सुंदर आहे. पण तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असतात, जे इतरांना कॉम्प्लेक्स देणं ही त्यांची जबाबदारी आहे, असं मानतात. जेव्हा मी लहान होते, तेव्हा मला असं वाटायचं की माझं नाक लहान आहे. माझ्या त्वचेचा रंग  गव्हाळ आहे, मी गोरी नाही'.   कालांतराने अभिनेत्रीला जाणवले की, प्रत्येक जण जन्मत: सुंदर असतो.  तिने याबाबत सांगितले की, 'मला जे काही वाटत होते, त्यानंतर मला स्वत:वर मेहनत घ्यावी लागली. त्यावेळी मी उघडपणे कुणाला सांगूही नाही शकले की, ती मॅडम मला नेमकं काय म्हणाली होती. पण आता मला असं वाटतं ती, मी खूप चांगली आहे,   कारण दृष्टिकोनच माझा खूप सुंदर आहे', असं सोनाली कुलकर्णी म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Imran Khan: सीजेपीच्या आंदोलनात गेलेल्या इम्रान खानला भारतातून हाकलणार? भारत सोडून जाण्याची नोटीस, नेमकं काय घडलं?