Prajakta Mali marriage question funny reply:महाराष्ट्राची क्रश अर्थात प्राजक्ता माळी (Prajakta Mali) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. अभिनय असो किंवा नृत्य. तिनं कायमच प्रेक्षक तसेच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. अभिनयासह प्राजक्ता शो होस्ट देखील करते. अभिनेत्री प्रोफेशनलसह वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. प्राजक्ताच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय? हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो. दरम्यान, चाहते तिला कायम, लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारतात. एका चाहत्याने लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्राजक्तानं भन्नाट उत्तर दिलं आहे.
अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर ASK ME NOW द्वारे चाहत्यांशी थेट संवाद साधला. यावर नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला विविध प्रश्न विचारले. तसेच प्राजक्तानेही चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. कधी मिश्किलपणे तर, कधी थेट उत्तरं अभिनेत्रीने विचारलेल्या प्रश्नांची दिली. यावेळेस एका चाहत्याने प्राजक्ताला पर्सनल प्रश्न विचारला, त्यानं 'एक राष्ट्रीय प्रश्न लग्न कधी करणार?', असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं अभिनेत्रीनं अगदी मिश्किलपणे उत्तर दिलं आहे.
लग्न कधी करणार? या प्रश्नावर अभिनेत्रीने उत्तर देत म्हटलं, 'हम्म्म.. हा खरंतर माझ्या आई वडिलांचा प्रश्न आहे. हा प्रश्न तुमचा नाही..', असं मिश्किल उत्तर तिनं इन्स्टाग्रामवर दिलं. उत्तराच्या पुढे तिनं स्माईल इमोजी देखील जोडला. प्राजक्ता नेमकं कधी लग्न करणार? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. या आधी एका मुलाखतीत प्राजक्ताने लग्नाच्या प्रश्नावर संकेत देत उत्तर दिलं होतं. अभिनेत्री म्हणाली, 'माझ्या आईनं मला मुलं बघायला सुरु केली आहे. पण आपण बघूयात पुढे नेमकं काय घडतंय...' असं प्राजक्ता म्हणाली. सध्या प्राजक्ता विविध प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असल्याची माहिती आहे. प्राजक्ता कोणत्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये दिसणार? याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
