Marathi Actress Nandita Patkar Tied Knot With Vipul Mahagaonkar: मराठी इंडस्ट्रीतली (Marathi Industry) लोकप्रिय अभिनेत्री (Marathi Actress) वयाच्या 44 व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढलीय. मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिका विश्वात (Marathi Television Industry) आपल्या सहजसुंदर अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री नंदिता पाटकरनं (Actress Nandita Patkar) आपली लग्नगाठ बांधली आहे. मराठी अभिनेत्री नंदिता पाटकरनं नाट्य दिग्दर्शक विपुल महागावकर (Theatre Director Vipul Mahagaonkar) यांच्याशी आपली साताजन्माची गाठ बांधली आहे. दोघांच्या लग्नसोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गळ्यात हार घातलेला नवरा-नवरीच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. 

Continues below advertisement

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री नंदिता पाटकर आजवर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दिसली. अनेक नाटकांमध्येही नंदितानं महत्त्वाच्या भूमिका साकारल्यात. पण, 'सहकुटुंब सहपरिवार' ही टीव्ही मालिका आणि 'एलिझाबेथ एकादशी' सिनेमामुळे तिला खरी ओळख मिळाली. त्यापूर्वी नंदिता 2015-2016 साली 'माझे पती सौभाग्यवती' या मालिकेत वैभव मांगलेसोबत दिसलेली. सध्या नंदिता पाटकर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिनं आपली लग्नगाठ बांधली आहे. इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच नंदिताचं लग्न झालेलं, पण पुढे काही दिवसांतच संसार मोडला आणि तिचा घटस्फोट झाला. आता नंदितानं दुसऱ्यांदा आपली लग्नगाठ बांधली असून आपल्या नव्या संसाराला सुरुवात केलीय. 

अभिनेत्री नंदिता पाटकर आणि नाट्य दिग्दर्शक विपुल महागावकर दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये दोघेही नवविवाहित दाम्पत्याच्या वेशात दिसत आहेत. दोघांनीही आपल्या लग्नासाठी गोल्डन आउटफिट्सची निवड केलेली. या नवविवाहित दाम्पत्यावर अभिनंदानाचा वर्षाव होतोय.

Continues below advertisement

अभिनेत्री नंदिता पाटकरचा नवरा नाट्य दिग्दर्शक विपुल महागावकर कोण? (Actress Nandita Patkar Husband Vipul Mahagaonkar)

विपुल महागावकर मराठी इंडस्ट्रीतलंच एक नाव. हा पडद्यावर दिसत नसला, तरीसुद्धा पडद्यामागे मात्र अनेक महत्त्वाच्या भूमिका सांभाळतो. विपुल महागावकर नाट्य दिग्दर्शक, डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आणि नाट्य संयोजक आहे. 'बॅकस्टेज आर्टिस्ट' म्हणून कामाची सुरुवात करणाऱ्या विपुल महागावकर याचं नाव तरुण, अभ्यासू दिग्दर्शकांमध्ये घेतलं जातं. त्यानं आजवर 17 पेक्षा जास्त एकांकिकांचं आणि 5 प्रायोगिक नाटकांचं दिग्दर्शन केलंय. 'पै पैशाची गोष्ट', 'खिडकी', 'उध्वस्त धर्मशाळा' सारख्या दर्जेदार नाटकांच्या माध्यमातून त्यानं आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Gaurav More Marriage: हास्यजत्रेतील 'फिल्टर पाड्याचा बच्चन ' अडकला लग्नबंधनात! गौरव मोरेनं खऱ्या आयुष्यात पोरगी पटवलीच; चाहत्यांना सुखद धक्का