Mayuri Kapadne Marries Businessman in private ceremony: मे महिना जवळ येताच, अनेक घरांमध्ये लगीनघाई (Marriage ceremony) सुरु होते. अनेक मराठी कलाकारही विवाह बंधनात अडकले आहेत. अभिनेत्री अपूर्वा गोरेपासून ते पुजा बिरारी, अनेक जण विवाहबंधनात अडकले आहेत. या कलाकारांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनेही लग्नगाठ बांधली. अपूर्वा खरंतर अनेकांची क्रश. आता आणखी एका अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा होत आहे. मराठी मालिकेतील अभिनेत्री मयुरी कापडणे (Mayuri Kapadne) हिनं नुकतंच लग्न केलं. अगदी गुपचूप पद्धतीने तिनं लग्न केलं असल्याची माहिती आहे. सध्या तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
स्टार प्रवाहवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर तयार करणारी अभिनेत्री मयुरी कापडणे हिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. उदे गं अंबे या मालिकेतून मयुरी सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. सध्या मयुरी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिनं नुकतंच लग्न केले असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीचा 27 मार्च रोजी अगदी सिंपल पद्धतीने विवाह सोहळा पार पडला.
मयुरी कापडणे या अभिनेत्रीनं ठाण्यातील युवान ग्रुपचे सर्वेसर्वा आणि बिझनेसमॅन स्वप्नील मराठे याच्याशी विवाह केला. मयुरीने अद्यापपर्यंत कधीही तिच्या नात्याबद्दल खुलासा केला नव्हता. कधीही मिस्ट्री मॅनसोबत अभिनेत्री स्पॉट झालेली नाही. परंतु, तिच्या लग्नाचीच बातमी समोर येताच अनेकांना धक्का बसला. तिच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
इट्स मज्जाने अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत. या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करुन शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पुढील वैवाहिक आयुष्यासाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या. लग्नाची माहिती मिळताच अनेक सेलिब्रिटींनीही नवीन विवाहित जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अभिनेत्री मयुरी ही मुळची पुण्यातील रहिवासी आहे. तिनं मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही काम केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
