Aarti Solanki Balancing Devi Murti: भव्यता आणि अगदी दिमाखात जागोजागी गणेशोत्सव (Ganeshotsav) मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला. या सणानिमित्त गणपती बाप्पांचे भव्य आणि विशेष म्हणजे बॅलेन्सिंग स्वरुप पाहायला मिळालं. बॅलेन्सिंग गणपती बाप्पांची मूर्ती ही सध्या अत्यंत लोकप्रिय आणि वेगाने व्हायरल होणारी ट्रेंड, मूर्तीकलेचा एक प्रकार आहे. गणपती बाप्पांची  मूर्ती बऱ्याचदा एका पायावर हवेत तरंगत असल्याचं पाहायला मिळतं. यावर्षी बॅलेन्सिंग मूर्तीचा ट्रेंड वेगाने व्हायरल झाला. यावर संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळालं.  काहींनी मूर्ती घडवणाऱ्यांचं कौतुक केलं. तर, काहींनी  अशा स्वरुपाच्या मूर्ती तयार करणं योग्य नाही, असं म्हटलं. गणेशोत्सावाला आरती सोळंकी (Aarti Solanki) हिनं,  'गणपती बाप्पांचं स्वरुप मुळात देखणं आहे, बाप्पांना वेगळ्या रुपात घडवण्याची गरज काय?' असं म्हटलं होतं. दरम्यान, आता गणेशोत्सवानंतर सर्वत्र सर्वांना नवरात्रीचे वेध लागले आहे. देवींचेही आगमन सोहळे पाहायला मिळतील.  दरम्यान, आता गणपती बाप्पााप्रमाणे देवींचीही बॅलेन्सिंग मूर्ती (Navratri) पाहायला मिळत आहे. यावर मराठी अभिनेत्री आरती सोळंकी हिची प्रतिक्रिया समोर आली आहे. तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करुन आपले मत मांडले आहे.

Continues below advertisement

बॅलेन्सिंग देवींच्या मूर्तींवर मराठी अभिनेत्री आरती सोळंकी हिने प्रतिक्रिया दिली आहे (Marathi Actress Aarti Solanki on Balancing Devi Murti Navratri)

आरती सोळंकी हिने बॅलेन्सिंग देवींच्या मूर्तींवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या अभिनेत्रीच्या पोस्टची प्रचंड चर्चा होत आहे. या पोस्टमध्ये  तिने म्हटलं की, 'बॅलेन्सिंगच्या नावाखाली  तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तींना हवेत लटकवलं, पण आता कृपा करुन देवींच्या मूर्तींना हवेत लटकवू नका. एवढीच आपली कला दाखवायची असेल तर, त्याच अँगलवर आपल्या घरच्यांना हवेत लटकवा.  तेव्हा आम्ही तुमचं कौतुक करायला नक्की येऊ.  शेवटी एवढंच सांगेन, आपल्या हिंदू सणांची परंपरा, मर्यादा, शिस्त जपा. त्याचं हसू होऊ देऊ नका', असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ही पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने 'अंबे कृपा करी', असं कॅप्शन दिलं आहे.

Continues below advertisement

अभिनेत्री आरती सोळंकीची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. काही नेटकऱ्यांनी आरतीच्या म्हणण्याला सहमती दर्शवली आहे.  सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. आरती सोळंकी  सोशल मीडियात सक्रीय असते. दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींवर अभिनेत्री आपले मत मांडत असते. तिने आतापर्यंत विविध विषयांवर आपले मत मांडले आहे.  अभिनेत्रीच्या पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत असतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...