मुंबई : एका बड्या उद्योगपतीच्या हजारो कोटींच्या कर्ज सेटलमेंट प्रकरणाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेते विक्रम गायकवाड (Vikram Gaikwad Post) यांनी एक सोशल मीडियावर एक उपरोधिक पोस्ट शेअर केली आहे. विक्रम गायकवाड यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल (Vikram Gaikwad Post) होत असून या पोस्टनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.(Vikram Gaikwad Post)
Vikram Gaikwad Post : विक्रम गायकवाड यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
सोशल मीडियावर कायमच सामाजिक व राजकीय घडामोडींवर आपलं मत व्यक्त करणाऱ्या विक्रम गायकवाड यांनी उद्योगपतीच्या हजारो कोटींच्या कर्ज सेटलमेंट प्रकरणासंदर्भात पोस्ट लिहिली आहे. 'माझ्यावर पण ७५ लाखांचं कर्ज आहे. साडेसातशेमध्ये मांडवली होईल का? कॅश देतो हवंतर.' अशी उपरोधिक पोस्ट विक्रम यांनी केली आहे. त्याचबरोबर , 'विचारून बघायला काय हरकत आहे.' असं या पोस्टला विक्रम यांनी कॅप्शन दिलं आहे. विक्रम यांच्या या पोस्टवर कलाकारांनी आणि चाहत्यांनी मजेशीर हसण्याचे इमोजी कमेंट करत पाठिंबा दर्शवला आहे.(Vikram Gaikwad Post)
Vikram Gaikwad :नेमकं काय आहे कर्ज प्रकरण?
एका बड्या उद्योगपतीच्या थकीत कर्जाबाबत राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडून (NCLT) मोठा दिलासा मिळाला आहे. NCLT ने त्यांच्या वैयक्तिक दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेत सुमारे २२,००६.५७ कोटी रुपयांच्या मंजूर कर्ज दाव्यांच्या सेटलमेंटसाठी अवघ्या ६.५ कोटी रुपयांच्या परतफेडीची योजना मंजूर केली. इतक्या मोठ्या कर्जाची अवघ्या ६.५ कोटी रुपयांत मांडवली झाल्यानं सर्वसामान्यांमधून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
Vikram Gaikwad :विक्रम गायकवाड यांनी काम केलेले मालिका आणि सिनेमे कोणते?
विक्रम गायकवाड हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर आपली रोखठोक मते मांडत असतात. लडाखमधील 'सीजेपी' आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांनी पुकारलेल्या उपोषणाला त्यांनी उघडपणे पाठिंबा दर्शवला होता. अभिनयाच्या प्रवासाबद्दल बोलायचे झाल्यास, 'उंच माझा झोका' या गाजलेल्या मालिकेने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. याशिवाय 'पावनखिंड', 'शेर शिवराज', 'लपाछपी', 'रघुवीर' आणि 'जारण' यांसारख्या विविध लोकप्रिय चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत.
