Continues below advertisement

Sharad Ponkshe Statement: महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होताच प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांसह काही कलाकारही सहभाही होताना दिसत आहेत. लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करत विविध मंचांवर नागरिकांशी संवाद साधला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेता शरद पोंक्षे यांनी हिंदुत्व या विषयावर आपली भूमिका मांडत निवडणुकांबाबत नागरिकांना आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी "हिंदुंचे कमीत कमी नुकसान करणाऱ्यांना मत द्या" असं म्हणत जनतेला आवाहन केलं आहे. तसेच "मत देताना सामाजिक हिताचा विचार करावा", असंही शरद पोंक्षे म्हणाले. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे गांधी परिवारावरही टीकेचे बाण सोडले आहेत.

कल्याण येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शरद पोंक्षे यांनी उपस्थितित होते. यावेळी त्यांनी हिंदुत्व या विषयावर आपली परखड भूमिका मांडली. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना प्रबोधन करत काही मुद्यांवर भाष्य केले.

Continues below advertisement

Sharad Ponkshe at Kalyan on Hindu Voter: हिंदुंना  दोन  प्रकारच्या  लढाया  लढायचे  आहेत

शरद पोंक्षे यांनी आपल्या भाषणात लोकशाहीतील निवडणुकांचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, "लोकशाही राज्यामध्ये आपल्या हिंदुंना दोन प्रकारच्या लढाया लढायचे आहेत. पहिली लढाई ही निवडणुकीच्या मैदानात बटन दाबून जिंकायची आहे. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, हे वाक्य मनात कोरून ठेवायचे आहे", असं शरद पोंक्षे म्हणाले आहेत. तसेच यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे गांधी कुटुंबावर टीकेचे बाण सोडले आहेत. "तीन माणसांचं घर ज्याला चालवता येत नाही, त्यांनी 140 कोटींचा देश चालवणाऱ्याला शिकवू नये", असा घणाघात यावेळी त्यांनी केला.

दोन्ही लढाई आपल्याला गुप्तपणे लढायच्या आहेत

शरद पोक्षेंनी भाषणावेळी बोलताना जनतेला आवाहन देखील केलं आहे, "हलालच्या वस्तू वापरू नका. जाळीच्या टोपीवाल्यांकडून काहीही खरेदी करू नका. दोन्ही लढाई आपल्याला गुप्तपणे लढायचे आहेत. संविधानाने दिलेल्या अधिकारात आपल्याला गुप्तपणे लढाई लढायची आहे. हिंदू राष्ट्र तयार करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना नेमक्या कुठली लढाई जिंकायची आहेत, ते मी तुम्हाला सांगितलं आहे", असंही पोंक्षे म्हणालेत. दरम्यान, त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

मुंबईतील पॉश इमारतीला भीषण आग, बॉलिवूड निर्माते थोडक्यात बचावले, अंकिता लोखंडेकडून मदतीचा हात

प्रसिद्ध अभिनेता अन् दिग्दर्शकाचा मृत्यू; हृदयाच्या आजारामुळे झाले होते त्रस्त, 72 व्या वर्षी निधन