Sharad Kelkar Statement on Chhatrapati Shivaji Maharaj: सध्या 'छावा' (Chhaava) चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) थोरले चिरंजीव छत्रपती संभाजी महारांजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांनी आणि समिक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. अशातच चित्रपटातील मुख्य भूमिका विक्की कौशलनं साकारली आहे. पण, सुरुवातीला ज्यावेळी चित्रपटातील मुख्य भूमिकांचे लूक रिवील करण्यात आले, त्यावेळी विक्की कौशलला पाहून काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच, त्याऐवजी शरद केळकरनं भूमिका साकारायला हवी होती, असं अनेकांनी म्हटलं होतं. अखेर तान्हाजी सिनेमात शिवरायांची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात मानाचं स्थान मिळवलेल्या शरद केळकरनं इंडस्ट्रीत रिलीज होणारे चित्रपट आणि त्या चित्रपटांतील छत्रपती शिवरायांची भूमका यावर आपलं परखड मत मांडलं आहे. 

मराठी अभिनेता शरद केळकरनं डिजीटल कॉमेंट्रीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अनेक गोष्टींवर भाष्य केलं. यावेळी शरद केळकरला तान्हाजी सिनेमात छत्रपती शिवरायांची भूमिका साकारल्यानंतर पुन्हा कधीच महाराजांची भूमिका का साकारली नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यानं थेट पण परखड शब्दांत आपलं मत व्यक्त केलं. 

शरद केळकर म्हणाला की, "जनतेकडून मला भरपूर प्रेम मिळालं. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण तान्हाजी रिलीज झाल्यानंतर मला भरपूर इव्हेंट्समधून असंख्य आमंत्रण आली. पण त्यांची एकच विनंती असायची की, मी तिथे महाराजांच्या वेशभूषेत यावं. त्यामुळे अशा ठिकाणी आजवर मी कधीच गेलो नाही. मी त्यांना स्पष्ट नकार दिला. माझा एक नियम आहे की, ज्या व्यक्तीमुळे मला इंडस्ट्रीज इतका सन्मान मिळाल्या त्याचा मला स्वतःसाठी वापर करायचा नाहीये..."

"स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करणं, मला कधीच पटलं नाही. सर आमच्या सिनेमात महाराजांचे सहा सीन्स आहेत तुम्ही कराल का? अशी विचारणा मला होते, मी स्पष्ट नकार देतो. मला असं अजिबात करायचं नाहीये. कारण तुम्ही फक्त महाराजांचा वापर करू इच्छिता... त्यांच्या नावाचा उपयोग करून तुम्ही त्या सिनेमाला मोठा करायचा प्रयत्न करत आहात. तुम्ही फक्त आणि फक्त महाराजांवर सिनेमा बनवा... मी नक्कीच करेन.", असं शरद केळकर म्हणाला आहे. 

दरम्यान, मराठमोळा अभिनेता शरद केळकर आपल्या वेगळ्या आणि हटके भूमिकांसाठी ओळखला जातो. तान्हाजी सिनेमाव्यतिरिक्त शरद केळकरनं लक्ष्मी, ऑपरेशन रेमो, रानटी, भूमी, श्रीकांत यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. पण, तान्हाजीमध्ये त्यानं साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे त्याला प्रेक्षकांच्या मनात मानाचं स्थान मिळालं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chhaava Movie Deleted Scene: राजमाता सोयराबाई अन् सरसेनापती हंबीरराव यांच्यातील दमदार संवाद; 'छावा'मधला 'तो' Deleted Scene व्हायरल, सिनेमातून का वगळला?