Satish Pulekar On Nana Patekar: मराठी सिनेमे (Marathi Movie), नाटक (Theaters) आणि दूरदर्शन क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते अशा सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळणारं मराठमोळं नाव सतीश पुळेकर (Satish Pulekar). अभिनयातील शिस्त, दमदार व्यक्तिरेखा आणि रंगभूमीवरील योगदानामुळे त्यांची वेगळी ओळख आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कारही मिळालाय. सतीश पुळेकर यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन या तिन्ही माध्यमांत उल्लेखनीय काम केलंय. त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले असून अभिनयासोबत निर्मिती क्षेत्रातही योगदान दिले आहे. कामातील शिस्त आणि व्यावसायिक दृष्टिकोनासाठी ते ओळखले जातात. अलिकडील एका मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितलं की, त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे अनेकांना ते रागीट वाटतात, मात्र त्यांना कामातील शिस्त अधिक महत्त्वाची वाटते.

Continues below advertisement

नुकतीच सतीश पुळेकर यांनी ‘मित्र म्हणे’ युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. अनेक किस्से सांगितले. अशातच मुलाखतीत बोलताना त्यांना नाना पाटेकर (Nana Patekar) आणि त्यांच्या मैत्रीबद्दल विचारलं गेलं. त्यावेळी मात्र, त्यांनी यावर बोलणं टाळलं. एवढी चांगली मैत्री होती ती संपली..., असं ते म्हणाले. 

नाना पाटेकर यांच्याबाबत काय म्हणाले अभिनेते सतीश पुळेकर? (Satish Pulekar On Nana Patekar)

Continues below advertisement

मुलाखतीत अभिनेते सतीश पुळेकर यांना विचारलं की, तुमचं आणि नाना पाटकेरांचं काय झालं? तुमचं इतकं चांगलं कनेक्शन होतं ना ते? असं विचारताच सतीश पुळेकर काहीसे थांबले आणि म्हणाले, I Am Sorry, विषय नको कारण... आणि सतीश पुळेकरांनी मोठा पॉज घेतला. त्यानंतर म्हणाले की, "मित्र... मित्र माझे या क्षेत्रातले नाहीत. फक्त विनय आपटे. बाकीचे तसे माझे मित्र आहेत. एकतर माझ्या शाळेतले, किंवा वर्गातले माझे मित्र आहेत..."

एवढी चांगली मैत्री होती ती संपली... : सतीश पुळेकर

नाना पाटेकरांसोबतच्या मैत्रीबद्दल बोलताना सतीश पुळेकर म्हणाले की, "मला असं वाटतं. Im sorry. हा विषय नको याचं कारण असं की, एवढी चांगली मैत्री होती ती संपली... ज्यावेळी आविष्कारमध्ये मी होतो, तेव्हा जयदेव हट्टंगडी एकांकिका दिग्दर्शन करत होते. पु.लंच्या ‘म्हैस’ कथेवर ती एकांकिका होती. त्यात मी रोल करत होतो. एकांकिकेत बरीच मंडळी होती. तर जयदेव म्हणाला, मला सूत्रधाराच्या रोलसाठी एखादा असेल तर बघ ना. मी म्हणालो आणतो..."

मला काम करायचंय, मला रोल करायचाय असं एकसारखा नाना सांगत असायचा... : सतीश पुळेकर

"नाटकात यायच्या आधी नाना पाटेकर माझ्याकडे असायचा. किंवा मी नानाकडे असायचो. तो माझ्या क्लबच्या इथे यायचा. आम्ही एकांकिका करायचो. ‘नाट्यकेदार’ नावाची संस्था स्थापन केलेली होती. त्या संस्थेत सुधीर जोशी, उदय म्हैसकर, मी, नाना आम्ही एकांकिका करायचो. हे सगळं होतं... तिथेही मी त्याला घेऊन गेलो. जसं आविष्कारमध्ये... मला काम करायचंय, मला रोल करायचाय असं एकसारखा नाना सांगत असायचा. त्यामुळे मी त्याची जयदेवसोबत ओळख करुन दिली..."

"त्या एकांकिकेचे फक्त दोनच प्रयोग झाले. मग नाना तिथे राहिला... पहिलं गौराई नावाचं नाटक होतं राज्य नाट्य स्पर्धेसाठी. मग त्याचं सर्व सुरू झालं...", एवढंच बोलून सतीश पुळेकर शांत बसले, पुढे बोलणंच त्यांनी टाळलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?