Marathi Actor Parth Samthaan  Share Final Social Media Post: टीव्ही इंडस्ट्रीतला (TV Industry) लोकप्रिय चेहरा आणि 'चॉकलेट बॉय' मराठी अभिनेता (Marathi Actor) पार्थ समथान (Parth Samthaan) म्हणजे, तरुणींच्या गळ्यातील ताईत. सध्या तो त्यानं घेतलेल्या खूप मोठ्या निर्णयामुळे चर्चेत आला आहे. पार्थ सध्या त्याच्या आयुष्यातल्या अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करतोय. सतत होणाऱ्या ऑनलाइन ट्रोलिंगमुळे त्रस्त होऊन मराठमोळ्या अभिनेत्यानं खूप मोठं पाऊल उचललं आहे. ज्यामुळे चाहते चिंतेत पडले आहेत. 

मराठमोळा अभिनेता पार्थ समथान यानं इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून याबाबत खुलासा केला आहे. काही दिवसांपासून पेड बॉट अकाउंट्सकडून त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर अत्यंत खालच्या स्तराची टीका केली जात असल्याचं त्यानं सांगितलं आहे. त्याला अश्लील मेसेज केले जात आहेतच, पण त्यासोबतच त्याच्या कुटुंबीयांवरही अश्लील कमेंट्स केल्या जात आहेत. या सततच्या ट्रोलिंगमुळे तो मानसिकदृष्ट्या त्रस्त झाल्याचंही त्याच्या पोस्टमधून स्पष्ट होतंय. अशातच अभिनेत्यानं एक मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. 

अभिनेता पार्थ समथान इन्स्टा पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाला? 

मराठी अभिनेता पार्थ समथान यानं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक धक्कादायक खुलासा केला. त्यानं स्टोरीमध्ये लिहिलंय की, "मी नेहमीच शांत आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतो, पण जेव्हा तुमच्या कुटुंबावर अश्लील कमेंट्स केल्या जातात, तेव्हा शांत बसणं अशक्य होतं... कोणीतरी मुद्दाम पैसे देऊन हे फेक अकाउंट्स विकत घेतले आहेत आणि माझ्या खासगी आयुष्याची धिंडवडे काढले जात आहेत..."

पुढे बोलताना मराठी अभिनेत्यानं त्याला ट्रोल करणाऱ्यांना एक सूचक इशाराही दिलाय. त्याला होणाऱ्या ट्रोलिंगमागे कोणाचा हात आहे, याचा त्याला अंदाज आहे, असं त्यानं म्हटलं आहे. पण, अभिनेत्यानं त्या व्यक्तीचं नाव घेणं मात्र टाळलं आहे. त्या व्यक्तीचं नाव घेण्यात काहीही अर्थ नाही, असं त्यानं म्हटलं आहे. तसेच, सायबर क्राईम विभागाकडे तक्रारी करण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या मानसिक शांततेसाठी सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय त्यानं घेतला आहे. 

पार्थनं इन्स्टावर पोस्ट करत चाहत्यांना सांगितलं की, "काही काळासाठी तो सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे आणि लवकरच तो पुन्हा चाहत्यांच्या संपर्कात येईल..."

पार्थ समथान सध्या 'सेहर होने को है' या नव्या मालिकेत 'माहिद' नावाची मुख्य भूमिका साकारतोय. या मालिकेत त्याच्यासोबत माही विज आणि कनिका माहेश्वरी सारखे कलाकार दिसत आहेत. यावरही पार्थनं भाष्य केलंय. तो म्हणाला की, आता तो आपली सर्व ऊर्जा या भूमिकेवर आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यावर केंद्रित करणार आहे. 

"सोशल मीडियाच्या या नकारात्मकतेत स्वतःला संपवण्यापेक्षा, माझ्या कामावर लक्ष देणं गरजेचं आहे. लवकरच भेटू! लव्ह पीएस," असं लिहित अभिनेता पार्थ समथान यानं सोशल मीडियावरुन चाहत्यांचा निरोप घेतला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Director David Dhawan On Retirement: 'मला आता आणखी काम नाही करायचं...', गोविंदाला सुपरस्टार बनवणाऱ्या दिग्गज दिग्दर्शकाची बॉलिवूडमधून निवृत्ती? स्वतःच केला खळबळजनक खुलासा...