Marathi Actor Omkar Karve Post On Manohar Mama: स्वतःला 'बाळूमामाचा अवतार' (Balumama) सांगून भोंदूगिरी करणारा मनोहर मामा भोसले (Manohar Bhosle) याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी (Solapur Rural Police) पुन्हा अटक केली आणि आधीच अशोक खरात (Ashok Kharat Case) प्रकरणामुळे ढवळून निघालेला महाराष्ट्र (Maharashtra News) पुन्हा एकदा ढवळून निघाला. करमाळ्यातील 27 एकरांचा आलिशान आश्रम, व्यवसाय वाढवण्याचे आमिष दाखवून 50 हजारांची फसवणूक आणि एका व्यावसायिकाला भोंदूगिरीच्या प्रकरणात अडकवल्याप्रकरणी कुर्डुवाडी पोलिसांनी मनोहर मामावर (Manohar Mama) ही कारवाई केल्याची माहिती मिळतेय. सध्या राज्यभरात हे प्रकरण चर्चेत असतानाच आता टेलिव्हिजन इंडस्ट्रीशी (Television Industry) मनोहर बाबाचं कनेक्शन आहे की, काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. यासाठी कारण ठरतेय मराठी अभिनेत्यानं (Marathi Actor) केलेली सोशल मीडिया पोस्ट (Social Media Post). मराठी अभिनेत्याच्या सोशल मीडिया पोस्टनं सध्या खळबळ माजली असून अभिनेत्याचा रोख नेमका कुणाकडे आहे? असाही प्रश्न उपस्थित होतोय.
मराठी सिनेसृष्टीतला (Marathi Industry) प्रसिद्ध अभिनेता ओंकार कर्वे (Actor Omkar Karve) यानं त्याच्या फेसबुक अकाउंटवरुन (Facebook Account) एक पोस्ट केली. ओकांर कर्वेच्या पोस्टमुळे भोंदूाबाबा मनोहर मामा यांचं टेलिव्हिजन इंडस्ट्रीशी खरंच कनेक्शन तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ओंकार कर्वेनं फेसबुक पोस्टमध्ये खळबळजनक खुलासा करत टेलिव्हिजन इंडस्ट्रीतल्या एका सुप्रसिद्ध निर्मात्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, अभिनेत्यानं पोस्टमध्ये कुणाचंही नाव घेतलेलं नाही.
मराठमोळा अभिनेता ओंकार कर्वे सोशल मीडिया पोस्टमध्ये मनोहर मामांबाबत नेमकं काय म्हणाला?
मराठमोळा अभिनेता ओंकार कर्वे पोस्टमध्ये म्हणाला, "मी कलाकार आहे. अनेक ठिकाणी माझी बदनामी करणारा, अनेकांना सेटवर मारहाण करणारा, शिवीगाळ करणारा निर्माता जो अनेक वर्ष दादासाहेब फाळके चित्रनगरी इथं एका संत महात्म्यावर टीव्ही शो करत होता. त्याला सगळा पैसा हा मनोहर मामाचा लागला का? असा मला प्रश्न आहे..."
पुढे बोलताना अभिनेता ओंकार कर्वे म्हणाला की, "कोणी माझं काही बिघडवू शकत नाही, माझ्या अंगाला कोणी हात लावू शकत नाही, इतकी याची हिंमत... ही सगळी या मामाच्याचमुळे. या मामाच्या जीवावरच तो सगळ्यांना धमकी देत होता. त्यामुळे या माणसाचीसुद्धा चौकशी व्हावी. त्या निर्मात्याची संपूर्ण चौकशी व्हावी. त्याचे एसडीआर आणि सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढावं...", अशी मागणी ओंकारनं केली आहे.
"ज्यांना जे जे माहीत आहे, ते त्यांनी उघड उघड बोला... नाहीतर येणाऱ्या नवीन कलाकारांना सुद्धा खूप गोष्टी भोगाव्या लागतील... वेळीच जागे व्हा...", असं आवाहनही त्यानं इतर कलाकारांना केलं आहे.
अभिनेता ओंकार कर्वे कोण?
भोंदूबाबा मनोहर मामाचं टेलिव्हिजन इंडस्ट्रीतलं कनेक्शन आणि प्रसिद्ध निर्मात्याशी असलेले सलोख्याचे संबंध असल्याचा आरोप करणारा मराठी अभिनेता ओंकार कर्वे यानं अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ओंकार कर्वे सध्या 'स्टार प्रवाह'वरच्या मालिकेत अन्वयचं पात्र साकारतोय. त्यापूर्वी त्यानं 'उदे गं अंबे...' या गाजलेल्या मालिकेतही काम केलेलं. याव्यतिरिक्त त्यानं 'स सासूचा', 'स्वप्न तुझे नी माझे', 'निर्भया' या मराठी सिनेमांमध्येही काम केलंय.
अटकेत असलेला भोंदूबाबा मनोहर मामा कोण?
मनोहर मामा (मनोहर भोसले) हा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील एक स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आहे, जो स्वतःला संत बाळूमामांचा अवतार सांगून भक्तांची फसवणूक व लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आला.
मूळचा इंदापूरातल्या लारसुणे गावातला मनोहर भोसले डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवडा बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करत होता. एक दिवस तो अचानक गायब झाला. काही वर्षानंतर पुन्हा याच गावात आला, तो स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू बनून. त्याने आपल्याला संत बाळूमामा प्रसन्न असून त्यांचा आशीर्वाद असल्याचं सांगितलं. स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणत होता.
