Marathi Actor On PM Modi Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सोशल मीडियावर चांगलेच ॲक्टिव्ह झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ शेअर करत जंतर मंतरवर त्यांना शिवीगाळ केली गेल्याचा उल्लेख केला. मात्र, मुलांना माफ करायचंय, असं देखील ते म्हणाले. त्यांच्या या videoवर राजकीय वर्तुळासह मनोरंजन सृष्टीतूनही अनेक प्रतिक्रिया समोर घेत आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता किरण मानेने (Kiran Mane) सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टची सध्या चर्चा सुरू आहे. 

Continues below advertisement

जेनझी इतनी नासमझ नही है दद्दू.. असं कॅप्शन देत त्यांनी ही पोस्ट केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बिग बॉस मराठी फेम अभिनेत्याने जोरदार टीका केली आहे. 

काय म्हणाला किरण माने?

Continues below advertisement

पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी रात्री जंतर मंतर वरील आंदोलनात शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांना माफ केल्याचे म्हटल्यानंतर, अभिनेता किरण मानेने एक पोस्ट शेअर केली आहे. तो म्हणाला ' संसदेतून शेपूट घालून पळायचं आणि इन्स्टावर रील टाकून खोटा पुळका दाखवायचा...पत्रकार परिषदांना घाबरायचं आणि इकडं स्क्रिप्टेड पोकळ ग्यान पाजळायचं. 'जेन झी' के सामने ये पेंतरे नही चलते दद्दू. त्यामुळेच ते म्हणतात, ' चाय बना ...' "; अशी पोस्ट अभिनेता किरण मानेने केलीय.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

नरेंद्र मोदी म्हणाले की, हाय फ्रेंडस, माझ्या मनाला वाटतं फक्त तुमच्याशी बोलू, जंतर मंतरवर जे झालं ते देश आणि जगानं पाहिलं आहे. काही खोडकर मुलांनी शिवीगाळ केली. कोणत्याही समाजाला शोभणार नाही, अशा शब्दांचा वापर केला गेला. मला शिव्या दिल्या, माझ्या स्वर्गीय आईला देखील शिव्या दिल्या. मात्र, मला आज बोलायचं आहे, लहान असताना चुका होतात, लहानपणात सुधारण्याची संधी असते,हेच लहानपणाचं लक्षण आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. 

मी समाजात असलेला आक्रोश चांगल्या समजून घेऊ शकतो, हा सांस्कृतिक धक्का आहे. आपल्या मुली अशा प्रकारची भाषा कशा बोलू शकतात हा प्रश्न आहे. मात्र, वेळ आहे, या मुलांची गळाभेट घेऊन त्यांना मार्ग दाखवण्याची गरज आहे. या भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम आहे, असं देखील मोदींनी म्हटलं.

नरेंद्र मोदी पुढं म्हणाले, मुलांना शिक्षा देणे, न्यायालयाच्या फेऱ्या मारायला लावणं,समाजात त्यांना त्रास देणं, यातून आपण परिस्थिती बदलू शकत नाही. मला त्यांना माफ करायचं आहे. समाजानं माझी ही गोष्ट स्वीकारावी. कारण माझ्या मनात हीच भावना आहे. कारण, कधी कधी दातांमध्ये जीभ चावली जाते, रक्त येतं, त्यामुळं आपण दात तोडत नाही, कारण दात आपलेच, जीभ आपलीच असते. 

मोदी म्हणाले. देश पुढं जातोय, मुलांनी पुढं जावं यासाठी सोबत येऊन काम करु, असं मोदी म्हणाले. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर, शुक्रवारी पंतप्रधानांनी इंस्टाग्रामवर एक वक्तव्य जारी केले होते. या Video मध्ये त्यांनी आंदोलनादरम्यान शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांना माफ केल्याचं म्हटलं होतं. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, "माझ्या आणि माझ्या दिवंगत आईबद्दल वापरलेले अपशब्द नक्कीच वेदनादायी होते, परंतु तरुणांना त्यांच्या चुकांमधून शिकण्याची संधी मिळायला हवी."