Ashok Shinde Talk About Multiple Marathi Film Releases: मराठी मनोरंजनविश्वातील चिरतरुण अभिनेता म्हणून अशोक शिंदे (Ashok Shinde) यांची ओळख. नाटक, चित्रपट, मालिकांमधून नायक, सहनायक तसेच खलनायक अशा विविधांगी भूमिका त्यांनी आजवर साकारल्यात. आपल्या व्यक्तिमत्वाच्या आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. 

Continues below advertisement

'मराठी मनोरंजन विश्व' या यूट्यूब वाहिनीला मराठी अभिनेते अशोक शिंदे यांनी नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी मराठी इंडस्ट्रीतील एक भयाण वास्तव सर्वांसमोर आणलं आणि त्याला पूरक असं उदाहरणंही दिलं. मराठीत एकी अजून नाही..., असं वक्तव्य अभिनेते अशोक शिंदे यांनी केलं आहे. 

मराठी अभिनेते अशोक शिंदे नेमकं काय म्हणाले? 

मराठी अभिनेते अशोक शिंदे म्हणाले की, "माफ करा. कुणी वैयक्तिक घेऊ नका. पण मराठीत एकी अजून नाही... एक उदाहरण देतो, जेव्हा संजय लीला भन्साली यांचा 'पद्मावत' आणि अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' एकाच वेळी येणार होते, तेव्हा त्यांनी आपापसात ठरवून एक आठवड्याचं अंतर ठेवलं. यामुळे दोन्ही सिनेमांच्या सुरुवातीच्या कमाईचा फायदा झाला".

Continues below advertisement

पुढे बोलताना अशोक शिंदे म्हणाले की, "बोनी कपूर या सिनेमाचे निर्माते होते. जेव्हा कळलं की एकाच दिवशी पाच मराठी सिनेमे येणार आहेत, तेव्हा मी स्वतः चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून इतर निर्मात्यांना भेटलो. आपण एकेक आठवडा वाटून घेऊ, अशी विनंती मी केली होती. मात्र, 'तुम्ही हिंदीवाल्यांना मदत का करताय?' असा उलट प्रश्न मला विचारला गेला. त्यावर मी म्हटलं, अजिबातच नाही. मी महाराष्ट्रीयन आहे, मराठी आहे, भाषेचा मला अभिमान आहे. पण यात हिंदी-मराठी असं न करता आपण व्यवसाय म्हणून बघू. कारण यात सगळ्यांचेच पैसे गुंतले आहेत".

"काही निर्मात्यांनी ठामपणे सांगितलं की, आम्ही मराठी माणसं आहोत आणि आमचा सिनेमा 'शोले' आहे, तो चालणारच. शेवटी एकाच दिवशी पाच मराठी सिनेमे आले. त्यात हिंदी, दाक्षिणात्य आणि हॉलिवूडचेही चित्रपट होते. परिणामी आम्हाला सकाळी 7 किंवा रात्री 11 असे शो मिळाले. हेच रिलीज जर एकेक आठवड्यांत केलं असतं, तर प्रेक्षकांकडेसुद्धा चॉइस असतो. त्यामुळे माझं मत आहे की, आपण विचार करून सिनेमे रिलीज करत नाहीत, तोपर्यंत मराठीत 'बाहुबली' होणारच नाही", असं अशोक शिंदे म्हणाले. 

दरम्यान, 'एका पेक्षा एक', 'रंगत संगत', 'हमाल दे धमाल', 'एवढंस आभाळ', 'लालबागची राणी', 'रॉकी', 'विजय दीनानाथचौहान', 'हर हर महादेव'   यासारख्या अनेक चित्रपटांमधून काम करत त्यांनी आपली लोकप्रियता जपली. मालिका विश्वातही अशोक शिंदे यांनी स्वतःचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.'घरकुल', 'दामिनी', 'अवंतिका', 'स्वप्नांच्या पलीकडे', 'दुहेरी', 'वसुधा', 'छत्रीवाली' आणि 'स्वाभिमान शोध या अस्तित्वाचा' यांसारख्या अनेक मालिकांमधील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.  'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'प्रेम प्रेम असतं', 'अपराध मीच केला', 'षडयंत्र', ‘ब्लाइंड गेम’ अशा विविध जॉनरच्या नाटकांमध्येही त्यांनी साकारलेल्या भूमिकांची चर्चा आजही सुरू आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Archana Puran Singh Miscarriage: 'सेटवरच मिसकॅरेज झालं, मग पतीला कधीच नको होतं मूल अन्...; प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला 'तो' कठीण प्रसंग