Anshuman Vichare: येत्या महाराष्ट्र दिनापासून राज्यातील सर्व परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात आहे. (Marathi Mandatory For Auto Taxi Driver) या निर्णयाविरोधात ऑटो-रिक्षा चालक मालक संघटनांचा रोष दिसून येत आहे. 4 मे पासून बाजारपेठा, रेल्वे स्थानके, बस डेपो, निवासी तसेच व्यापारी भागात दररोज निदर्शने करणार असल्याच्या संघटनांच्या पवित्र्यावर सर्व स्तरांतून प्रतिकिया उमटत आहेत. कलाविश्वातूनही या संपावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नव्या नियमांनुसार मराठी भाषा न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.अनेक मराठी सेलिब्रिटींनी मात्र सरकारच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. विनोदी अभिनेता अंशुमन विचारे याने दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे. 'मराठी मातीत कमवून माज करायचा नाही… मराठी सगळ्यात आधी' असं तो म्हणालाय. रिक्षा, taxi चालकांच्या मराठी न स्वीकारता आंदोलन करण्याच्या प्रकारची त्याने चांगलीच खरडपट्टी काढलीय.
मराठी वाचता-लिहिता न येणाऱ्या तसेच भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द केले जाणार असल्याचे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात 15 लाख रिक्षा आहेत. या निर्णयामुळे राज्यातील लाखो ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकांचे कुटुंब उद्धवस्त होईल. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा. या मागणीसाठी राज्यातील रिक्षा-टॅक्सीचालकांनी 4 मे पासून बाजारपेठा, रेल्वे स्थानके, बस डेपो, निवासी तसेच व्यापारी भागात दररोज निदर्शने करणार आहेत.
काय म्हणाला अंशुमन विचारे?
अभिनेता अंशुमन विचारे याने instagram वर स्टोरी टाकत या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला," मराठी मातीत कमावून माज करायचा नाही. मराठी सगळ्यात आधी" . असं तो म्हणालाय.
हेमंत ढोमे, रितेश देशमुखची प्रतिक्रिया
याआधी अभिनेता हेमंत ढोमे याने देखील सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून सरकारचा समर्थन केलंय. पंधरा लाख म्हणजे मोठा आकडा आहे. 15 लाखांना मराठी नको असेल तर एक काम करा म्हणाव. जिथे जमणार आहात तिथून तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा. तिथेच कमवा आणि खा महाराष्ट्रात मराठी बोला शिका प्रयत्न करा ..असं हेमंत ढोमे म्हणाला होता. अभिनेता रितेश देशमुखनेही 'महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य असली पाहिजे आपण जेव्हा दुसऱ्या राज्यात जातो तेव्हा आपणही त्यांची भाषा बोलली पाहिजे' अशी भूमिका घेत सरकारच्या निर्णयाच स्वागत केलं होतं .
