Marathi Actor Angad Mhaskar Second Marriage: सेलिब्रिटींची (Celebrity Wedding) लगीनसराई म्हणजे, चाहत्यांसाठी उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय. गेल्या काही महिन्यांत इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी आपली लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आता या यादीत आणखी एका नव्या कलाकाराची भर पडली आहे. मराठी मालिकाविश्वातील (Marathi TV Serials) एक लोकप्रिय अभिनेता नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला आहे. स्टार प्रवाहवरच्या लोकप्रिय मालिकेतला खलनायक, अभिनेता अंगद म्हसकर (Marathi Actor Angad Mhaskar) यानं आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. अंगद म्हसकरनं नेहा फडकेसोबत आपली लग्नगाठ बांधली आहे. मराठमोळ्या अभिनेत्यानं अत्यंत साधेपणानं आणि काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आपली लग्नगाठ बांधली.
मराठी अभिनेता अंगद म्हसकर (Angad Mhaskar) याचं हे दुसरं लग्न आहे. लग्नसोहळा अत्यंत साधेपणानं पार पडला. लग्नाला कुटुंबातील जवळचे नातेवाई आणि काही मित्रमंडळी उपस्थित होती. नेहा फडके असं अंगदच्या पत्नीचं नाव आहे. तर, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्यानं तिच्यासोबत फोटो शेअर करून त्यांच्या नात्याबाबत चाहत्यांना सांगितलं होतं. या फोटोसोबत फ्रॉम हेअर टू फोरेवर असं कॅप्शनही अंगदनं दिलं होतं. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झालाय.
अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान मिळवणारा अभिनेता अंगद म्हसकर यानं त्याच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यानं दुसऱ्यांदा आपली लग्नगाठ बांधली आहे. पहिल्या लग्नापासून अभिनेत्याला एक मुलगा आहे. अंगदच्या लग्नसोहळ्याचे खास क्षण सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. अंगदच्या लग्नाच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कमेट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला जातोय.
अभिनेता अंगद म्हसकर यानं मराठी सिनेमा, मराठी मालिका आणि रंगभूमीवर अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्यात. अभिनेत्यानं अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सातत्यानं काम करत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. खलनायक, ऐतिहासिक तसेच विनोदी भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले','बाजीराव मस्तानी', 'मध्यम सासू धडधड सून', 'गुंतता हृदय हे', 'तू तिथे मी', 'जयोस्तुते', 'अबोली' यांसारख्या मालिकांमध्ये त्यानं महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तर, त्यानं 'लोकमान्य : एक युगपुरुष', 'बालगंधर्व', 'बायोस्कोप', 'सविता दामोदर परांजपे', 'जग्गू अँड ज्युलिएट' यांसारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्यात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
