Manoj Jarange Patil Hindustani Bhau Controversy: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Maratha Leader Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला असून अंतरवली इथून थेट मुंबईकडे (Mumbai News) कूच केलं आहे. ऐन गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) काळात मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्यभरातील तमाम मराठा बांधवांना आवाहन करत आंदोलनाची हाक दिली आहे. मनोज जरांगे तब्बल 19 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यातच त्यांनी आता मुंबईतील आझाद मैदानात जाऊन उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय, त्यांच्यासोबत हजारोंच्या संख्येनं मराठा समाज एकवटला आहे.
एकीकडे ऐन गणेशोत्सवाच्या काळात मराठ्यांचं वादळ मुंबईच्या दिशेनं येतंय. तर, दुसरीकडे मुंबईकडे येणारे मराठे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. ऐन गणेशोत्सवात हजारो मराठे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी येत आहेत. त्यामुळे प्रशासनाचे धाबे काहीसे दणाणल्याचं पाहायला मिळतंय. अशातच प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर 'हिंदुस्तानी भाऊ' याचा एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलाय. या व्हिडीओमध्ये 'हिंदुस्तानी भाऊ'नं मनोज जरांगेंवर निशाणा साधलाय.
'हिंदुस्तानी भाऊ'च्या एका व्हिडीओमध्ये त्यानं थेट मराठा नेते मनोज जरांगेंच्या उपोषणावरच प्रश्न उपस्थित केलेत. दहा वेळा उपोषण झालंय, काही उपोषण वैगरे काही नाही, बरोबर बाथरुममध्ये जाऊन खातो हा... तंबाखू खातो, सलाईन चढतंय, असं 'हिंदुस्तानी भाऊ' म्हणाला आहे. तसेच, मराठ्यांनो तुम्हाला सांगतो, हा माणूस तुम्हाला फसवतोय... याच्या तुम्ही जाळ्यात फसू नका, असंही 'हिंदुस्तानी भाऊ' म्हणालाय.
'हिंदुस्थानी भाऊ' व्हिडीओमध्ये मनोज जरांगे पाटलांबाबत काय म्हणालाय? (Hindustani Bhau On Manoj Jarange Patil)
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हिंदुस्थानी भाऊ मनोज जरांगेंवर टीका करताना म्हणाला की, "मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय की, मी 19 तारखेला मुंबईत येतोय, गेल्यावेळी सुद्धा तुम्ही आलेले मुंबईत, तुम्हाला माहितीय, सणासुदीचे दिवस आहेत... सण सुरू आहेत, गणपती बाप्पा आलेत, नंतर देवी येतील... गेल्या वेळी तुम्ही आलेले, एवढा धिंगाणा केला, रस्त्यावर... मॉलमध्ये... हॉटेल्समध्ये एवढी घाण केली तुम्ही लोकांनी, त्या सणाचीच तुम्ही वाट लावून टाकली, माहोल खराब करुन टाकलेला... अख्ख्या महाराष्ट्रात साजरा होतोय गणेशोत्सव... तुम्हाला हीच वेळ मिळाली, यावेळीही तुम्ही येणार, गणपतीच्याच वेळी आणि लोकांचे सण खराब करणार, गेल्यावेळी तुम्ही केलं... मुंबईकर, महाराष्ट्रातले लोक काहीच बोलले नाहीत..."
"तुमचा मागण्या पूर्ण करण्याचा आग्रह होता, सरकारनं तुम्हाला काय दिलं माहीत नाही, तुमच्या मागण्यांचं... तेव्हा तुम्ही सर्व मराठा बांधवांना सांगितलं, भावांनो आपण जिंकलो... तेव्हा तुमचा वकील म्हणाला, दादा एकदा पेपर तपासून पाहा... तेव्हा तुम्ही त्याला म्हणाले, ए भाXX मला शिकवतो का? मी म्हटलं झालं तर झालं... तेव्हा मराठी बांधवांनी सर्वांनी तुमचं ऐकलं... आणि निघून गेले... थोड्या दिवसांनी तुम्ही सांगता, सरकारनं आम्हाला फसवलं... अहो, ऐकून घ्या ना... ते शिकलेले आहेत, त्यांचं ऐकायचं... आपल्याला नाही माहीत ना? कशाला मराठ्यांसोबत खेळताय, 30 हजार मुलांवर आतापर्यंत गुन्हे दाखल झालेत, त्यांच्या आई-वडिलांनी एवढा खर्च करुन ते लढतायत, कुणी त्यांना पैसा दिला, कुठला नेता आला? कोणी नाही आलं त्यांच्यासाठी...", असं हिंदुस्थानी भाऊ म्हणालाय.
'बिग बॉस' फेम 'हिंदुस्थानी भाऊ' म्हणाला की, "मराठ्यांसाठी तुम्ही लढताय, पण मराठ्यांची आताची जी पिढी आहे, त्यांना बरबाद करताय तुम्ही... त्यांच्यावर गुन्हे दाखल होतायत... तुमची भाषा काय? ए शिंद्या... ए विख्या... ए देव्या... हलक्यात घेता का तुम्ही? जेवढे पक्ष आहेत, त्यांना सगळ्यांना शिव्या देताय तुम्ही... तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्री आतापर्यंत असेच बनले, शिंदेसाहेब असेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बनले... तुमच्यासारखे किती गायब झाले असतील, माहिती नाही पडलं ते इथपर्यंत येईपर्यंत... गैरसमजात जगताय तुम्ही, समजलं का?"
उपोषण वैगरे काही नाही, बरोबर बाथरुममध्ये जाऊन खातो हा... : हिंदुस्थानी भाऊ
"तुमच्या तिथली एक महिला जिल्हाधिकारी आलेली, तिलाही धमकी दिली... हे तुम्ही नाही बोलत... तुमच्या पाठी जे उभे आहेत, त्यांची स्क्रिप्ट वाचताय तुम्ही... नाहीतर तुम्हाला जोड्यानं मारतील अशा बायका... तुमच्यासोबतचे सगळे सोडून गेले, कारण त्यांना समजलं की, दहा वेळा उपोषण झालंय, काही उपोषण वैगरे काही नाही, बरोबर बाथरुममध्ये जाऊन खातो हा... तंबाखू खातो, सलाईन चढतंय...", असं 'हिंदुस्थानी भाऊ' म्हणाला.
मराठ्यांनो तुम्हाला सांगतो, हा माणूस तुम्हाला फसवतोय... : हिंदुस्थानी भाऊ
"शिवछत्रपती महाराजांच्या पुतळ्या शेजारीच बसून तिथे थुकताय तुम्ही... ही तुमची लायकी... मराठ्यांनो तुम्हाला सांगतो, हा माणूस तुम्हाला फसवतोय... जे आतापर्यंत हजारो लोकांच्या डोळ्यांसमोर आलंय ना, ते तुमच्याही डोळ्यांसमोर येणार... याच्या तुम्ही जाळ्यात फसू नका... हा तुम्हाला फसवतोय, दुकान उघडून बसलाय... याच्या आजूबाजूला जेवढे बिझनेसमन आहेत, त्यांचा फायदा करतोय... डिफेंडरमध्ये फिरतोय...", असं हिंदुस्थानी भाऊ म्हणालाय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
