Manoj Bajpayee On FDA Chief Tukaram Mundhe:महाराष्ट्र अन्न सुरक्षा विभागाचे (FDA) प्रमुख तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) सध्या त्यांच्या कामामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या प्रयत्नांचं सर्वत्र कौतुक होतंय. त्यांची कामाची पद्धत पाहून अनेकजण त्यांना रिअल-लाइफ हिरो असंही संबोधत आहेत. आता बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी (Bollywood actor Manoj Bajpayee) यांनीही मुंढे यांच्या कामाचं, विशेषतः त्यांच्या कामाच्या पद्धतीचं कौतुक केलं आहे. 

Continues below advertisement

मनोज यांनी केलं तुकाराम यांचं कौतुक

मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी नुकतंच 'एएनआय' (ANI) शी संवाद साधताना प्रामाणिक कामाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन यावर भाष्य केलंय. ते म्हणाले की, आपण अशा काळात जगत आहोत जिथे पूर्ण प्रामाणिकपणा आणि निष्ठेनं काम करणारी व्यक्ती लोकांना अनेकदा आश्चर्यचकित करते. 

Continues below advertisement

अभिनेते मनोज वाजपेयी म्हणाले की, "एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची, किंवा उदाहरणार्थ तुकाराम मुंढे यांची, विशिष्ट काम करण्यासाठी नियुक्ती केली जाते. आजच्या काळात, जी व्यक्ती केवळ प्रामाणिकपणे आणि सचोटीनं आपलं काम करते, ती व्यक्ती व्हायरल होते आणि तिला 'सेलिब्रिटी'चा दर्जा मिळतो. ही परिस्थिती आपल्या समाजाची अवस्था दर्शवते, जिथे केवळ सामान्य आणि प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणंही लोकांना थक्क करते. तुम्ही हे कधी लक्षात घेतले आहे का?"

'लास्ट मॅन इन टॉवर' सिनेमाबद्दल

मनोज वाजपेयी बेन रेखी दिग्दर्शित 'लास्ट मॅन इन टॉवर' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती राणा दग्गुबती यांच्या 'स्पिरिट मीडिया'नं केली आहे. अरविंद अडिगा यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित सिनेमात दिव्या दत्ता आणि बोमन इराणी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

'लास्ट मॅन इन टॉवर'ची कथा

'लास्ट मॅन इन टॉवर'ची कथा मास्टरजी यांच्याभोवती फिरते, जे एक निवृत्त शालेय शिक्षक आहेत. आपल्या समाजाच्या इच्छेविरुद्ध जाण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या इमारतीतील रहिवाशांमध्ये संघर्षाला निमंत्रण देतो. जेव्हा यातील पात्रं आयुष्याला कलाटणी देणाऱ्या एका मोठ्या प्रसंगाचा सामना करतात, तेव्हा वैयक्तिक निवडी आणि नातेसंबंधांचे विविध पैलू या कथेतून उलगडले जातात. 'लास्ट मॅन इन टॉवर' 11 सप्टेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, मनोज वाजपेयींच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, 'गव्हर्नर', 'इन्स्पेक्टर जेड', 'डिस्पॅच', 'जुगनू-मा: द फेबल', 'भय्या जी' आणि 'सायलन्स 2: द नाईट आउल बार शूटआउट' यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये दिसले होते. त्यामुळेच, त्यांच्या 'लास्ट मॅन इन टॉवर' या आगामी सिनेमाच्या रिलीजची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत आहेत.