Manike Mage Hite Trend : सोशल मीडिया रातोरात कोणालाही स्टार बनवतं. असचं काहीसं झालं आहे श्रीलंकेतील गायिका आणि रॅपर योहानीसोबत. ती आधीपाहूनच प्रसिद्ध होती, पण काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिचं गाणं 'मानिके मगे हिते' प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या आवाजाची नेटकऱ्यांना भूरळ पडली आहे. केवळ नेटकरीच नाही तर युट्यूबर्स आणि बॉलिवूडकरही तिचं गाणं गुणगुणण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत. योहानीने आपला सहकारी गायक-संगीतकार सतीशनसोबत एक गाणं लाँच केले. मानिके मागे हिथे हे गाणं योहानीनं 22 मे रोजी यूट्यूब चॅनेलवर लाँच केलं. हळूहळू हे गाणे सुपर-डुपर हिट झालं असून केवळ श्रीलंकेतच नव्हे, तर भारतासह इतर देशांमध्येही हे गाणं खूप व्हायरल होत आहे.
योहानीनं गायलेलं हे गाणं सिंहली भाषेत आहे. अनेकांना तर त्याचा अर्थही समजत नाही. पण योहानीच्या आवाजाची, संगीताची जादू सर्वांच्या मनावर राज्य करत असल्याचं पाहायला मिळत आहे. गाणं ऐकायला खूप सुरेख आहे. हे गाणं इतकं व्हायरल झालं आहे की, 30 ऑगस्ट पर्यंत, Manike Mage Hite या गाण्याला YouTube वर 75 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही या गाण्याचं कौतुक केलं आहे. अमिताभ यांनी यासंदर्भाती एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पण, त्यांनी यामध्ये एक ट्वीस्ट दिला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "पार्ट 2... क्या किया.. क्या हो गया!!" बीग बींनी योहानीच्या या गाण्याचं खूप कौतुक केलंय. त्यांनी लिहिलं आहे की, "हे ऐकणं थांबवणंअसंभव आहे! सुपर्ब...."
अमिताभ बच्चन यांच्याव्यतिरिक्त इतर बॉलिवूडकरही योहानीच्या गाण्याचे फॅन झाले आहेत. हे गाणं इतकं लोकप्रिय झालं आहे की, भारतीय सेलिब्रिटी स्वतःचे व्हिडिओ बनवत आहेत आणि ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अभिनेत्री परिणीती चोप्रानं देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या गाण्याचा व्हिडिओ बनवून पोस्ट केला आहे.
'मानिके मगे हिते' गाणं :
सध्या हे गाणं प्रचंड व्हायरल होत आहे. एवढंच नाहीतर या गाण्याचे वेगवेगळे वर्जन्सही रिलीज केले जात आहेत. सोशल मीडिवर #ManikeMageHite हा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे.