Mangala Marathi Movie : काही दिवसांपूर्वीच 'मंगला' (Mangala) या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. पहिल्या अॅसिड हल्ल्यातून स्वत:ला सावरत एका गायिकेने तिच्या आयुष्याचा सुरेल प्रवास घडवला. हाच प्रवास या सिनेमातून दाखवण्यात येणार आहे. अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) हीने मंगलाची भूमिका साकारली आहे. नुकताच या सिनेमाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. 


काही दिवसांपासून 'मंगला' या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. अॅसिड हल्ल्यामुळे एका सुंदर अशा गायिकेची झालेली वाईट अवस्था या पोस्टरमधून समोर आली. यानंतर आता चित्रपटाच्या टीझरने चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे. हा हल्ला नेमका कशासाठी झाला यानंतर मंगलाने या संकटावर कशी मात दिली हा लढा या सिनेमातून पाहणं रंजक ठरणार आहे. 


सिनेमाचा टीझर रिलीज


नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे हा हल्ला नेमका कशामुळे झाला? हा हल्ला कोणी केला? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. हा सिनेमा येत्या 17 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या आणि भयावह हल्ल्यातून वाचलेल्या मंगला या सुप्रसिद्ध गायिकेचा जीवन प्रवास 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब साकारणार आहे. टीझरमध्ये पाहिल्याप्रमाणे चेहऱ्यावर झालेल्या ऍसिड हल्ल्याची खूण सतावत आहे. हे चित्र पाहण्याजोगं नसलं तरी या मागील गहन विषय साऱ्यांना खुर्चीत खिळवून ठेवेल यांत शंका नाही.


'रैश प्रोडक्शन प्रा.लि' आणि 'फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट' प्रस्तुत 'मंगला' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अपर्णा हॉशिंग यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू अपर्णा हॉशिंग, यशना मुरली, मोहन पुजारी, मिलिंद फोडकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरीची असून संवाद प्रथमेश शिवलकर याचे आहेत. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत शंतनु घटक याचे आहे. एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून शिवाली परबला मोठ्या  पडद्यावर पाहणं उत्सुकतेचं ठरेल. मंगलाची ही खरीखुरी कथा 17 जानेवारी 2025 रोजी मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरेल. 






ही बातमी वाचा : 


Rajeshwari-Somnath Wedding : 'कलवऱ्या नाहीत,ना वऱ्हाडी मंडळी, असं कोणतं लग्न असतं?' जब्या आणि शालूच्या फोटोंवर नेटकऱ्यांचे प्रश्न