Mandana Karimi Shift India To Dubai: प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood News) अभिनेत्री (Bollywood Actress) आणि 'बिग बॉस'ची (Bigg Boss) स्पर्धक मंदना करीमी (Mandana Karimi) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत कठीण आणि त्रासदायक परिस्थितीतून जातेय. तिनं नुकतंच सोशल मीडियावर धक्कादायक खुलासा केलाय. तिनं सांगितलं की, गेल्या सहा वर्षांपासून ती सतत सायबर-बुलिंग (Cyberbullying), ऑनलाइन छळवणूक आणि स्टॉकिंगची बळी ठरतेय. मंदना करीमीच्या म्हणण्यानुसार, भारत सोडून दुबईला स्थायिक झाल्यानंतरही हा मानसिक छळ थांबलेला नाही. तिनं आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर अनेक व्हिडीओ आणि स्क्रीनशॉट्स शेअर करून संबंधित व्यक्तीचं कृत्य उघड केलं आहे. यात तिनं स्पष्ट केलंय की, एक अज्ञात व्यक्ती कशा प्रकारे तिचं करिअर आणि वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतेय.

Continues below advertisement

अभिनेत्री सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हणाली? (Mandana Karimi On Cyberbullying)

आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन अभिनेत्री मंदाना करीमीनं पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीनं म्हटलंय की, मी सध्या सुट्टीवर आहे आणि हे पुन्हा घडलं आहे. माझा घटस्फोट होऊन 6 वर्ष झाली आहेत. तेव्हापासून मला सायबरबुलिंग आणि स्टॉकिंगचा सामना करावा लागतोय. एका अकाउंटवरून तर चक्क निर्मात्यांना आणि माझ्या सहकलाकारांना मेसेज करून माझ्याबद्दल वाईट गोष्टी सांगितल्या आणि त्यांच्याकडून पैशांची मागणीही केली जातेय. हे अजूनही सुरू आहे. मला समजत नाही की, लोक माझा इतका द्वेष का करतात? आणि माझ्याकडे काम, पैसा किंवा मित्र नसावेत, असं त्यांना का वाटतंय?"

Continues below advertisement

पुढे बोलताना मंदाना करीमीनं सांगितलं की, "चार वर्षांपूर्वी या प्रकरणाचा तपास करण्याचा प्रयत्न केला होता. ही व्यक्ती कोण आहे हे शोधण्यासाठी मी एकाला नेमलं होतं. मला सांगण्यात आलेलं की, कोणीतरी माझ्या पोस्ट्सवर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी एका हॅकरला पैसे दिले होते. मी कामानिमित्त जर कोणाच्या संपर्कात आले, तर मीनाक्षी नावाच्या महिलेच्या नावावरून त्यांना ईमेल पाठवले जात होते. मी आता भारत सोडून गेलेय, पण माझ्या मित्रांना अजूनही ईमेल येतात. खरं सांगायचं तर, मला ओळखणाऱ्या लोकांनीच हे ईमेल मला पाठवले आहेत आणि ते एका फेक अकाउंटवरुन आले आहेत. भारतातील पोलीस याबद्दल काहीही करू शकलेले नाहीत. कोणीतरी केवळ माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे..."

अभिनेत्री मंदाना करीमीनं सोशल मीडियावर तिला आलेल्या ईमेलचे स्क्रीनशॉट शेअर केलेत. आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलंय की, "आता बास्स झालं. अनेक वर्षांपासून, मला एका व्यक्तीकडून सतत सायबर छळ आणि स्टॉकिंगचा सामना करावा लागतोय. तो माझ्यावर बारकाईनं नजर ठेवतोय आणि ज्यांच्यासोबत मी फोटो शेअर करते किंवा संपर्कात राहते, त्यांना धमकी देणारे ईमेल पाठवतो. मी भारतातून दुबईला शिफ्ट झाल्यानंतरही हे सुरूच आहे. मी यापूर्वी सायबर सेलमध्ये अनेक तक्रारी दाखल केल्यात आणि आता मी जाहीरपणे बोलतेय आणि पुरावे सादर करत आहे..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mangesh Desai Emotional Post For Son: मंगेश देसाईंच्या लेकाला पाहिलंत? मुलगा पदवीधर झाल्यानंतर अभिनेता स्वतःच्या वडिलांच्या आठवणींनी व्याकूळ, लेकासाठी बापाची भावूक पोस्ट