Mamta Kulkarnis Goa Video: 90 चा दशक गाजवणारी अभिनेत्री अर्थात ममता कुलकर्णीनं (Mamta Kulkarni) एक काळ गाजवला. बोल्ड अदा आणि सुपरहिट चित्रपटांमुळे (Bollywood) ती कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. ममता सध्या आपल्या वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत असते. तिनं महाकुंभमेळ्यात संन्यास घेत सर्वांनाच धक्का दिला होता. तिनं भगवे वस्त्र परिधान करुन अध्यात्म्याची वाट निवडली होती. तिची बरीच चर्चा झाली. फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाले होते. दरम्यान, ममता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. परंतु, आता चर्चेत येण्यामागचं कारण वेगळं आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ती गोव्यात आपल्या मित्र परिवारासोबत एन्जॉय करताना दिसत आहे.
ममता कुलकर्णी गोव्याला (Goa Holiday) गेली आहे. तिथे तिनं मॉडर्न लूक कॅरी केला होता. या व्हिडिओत ममता आपले मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, यावेळेस ममता मॉडर्न कपड्यांमध्ये दिसली. तिनं डेनिम जॅकेट परिधान केला असून, तिच्या डोळ्यांवर गॉगल आहे. ममताने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओही शेअर केला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये ममता कुलकर्णी आपल्या कुटुंबाची ओळख करुन देते. मित्र परिवारासह ती एका गोव्यातील रेस्टॉरंटमध्ये असल्याचं दिसून येत आहे. संन्यास घेतल्यानंतर तिने पहिल्यांदाच मॉडर्न लूक कॅरी केल्यामुळे नेटकऱ्यांकडून ट्रोल होत आहे. काही युझरने तिच्या व्हिडिओवर कमेंट करुन टीका केली आहे. तसेच तिच्या लूकवरही काही प्रश्न उपस्थित केले आहे.
एका नेटकऱ्याने, 'काही काळापूर्वी संन्यासाच्या मार्गावर असलेली ही अभिनेत्री आता पुन्हा ग्लॅमरसच्या दुनियेत परतत आहे का?', असा सवाल उपस्थित केला. तर, काही नेटकऱ्यांनी ममता कुलकर्णीचा नवा लूक पाहून तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युझरने, 'संन्यासीजी भूत निघून गेले का?' अशी कमेंट करुन प्रश्न उपस्थित केला. तर, काहींनी, 'तुम्ही आधी साध्वी झाला होतात, मग आता पुन्हा त्याच अंदाजात का परतलात?', असा सवाल उपस्थित केला. माहितीनुसार, ममता कुलकर्णीने महामंडलेश्वरपदाचा राजीनामा दिला होता. तिनं संन्यास खरंच सोडला का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
काही दिवसांपूर्वी ममता कुलकर्णी लाफ्टर शेफच्या सेटवर दिसली होती. तिनं साडी नेसली होती. ती पुन्हा ग्लॅमरसच्या दुनियेत पाऊल ठेवणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला. दरम्यान, तिचा मॉडर्न लूक पाहून चाहत्यांना धक्का बसला.
