Mamta Kulkarni On Lord Vishnu 10th Avatar Kalki: दिग्दर्शक अमित प्रजापती (Director Amit Prajapati) यांचा 'गोदान' (Godan Film) हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा भारतीय संस्कृती आणि सनातन धर्मात गायीचं महत्त्व अधोरेखित करतो. हा सिनेमा गायीचं सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि सामाजिक महत्त्व सांगतो. तसेच, पंचगव्यांच्या फायद्यांवर विशेष भर देतो. कधीकाळची बॉलिवूड अभिनेत्री आणि साध्वी ममता कुलकर्णी यांनी या सिनेमाचं समर्थन केलं आहे. आयएएनएसशी बोलताना तिनं चित्रपटाचं कौतुक केलं आणि सर्व नागरिकांना संदेश दिला की, कोणत्याही धर्म असो, प्रत्येकानं हा सिनेमा पाहिलाच पाहिजे.

Continues below advertisement

कुराण, बायबलमध्येही आहे गायीचा उल्लेख : ममता कुलकर्णी 

ममता कुलकर्णी यांनी पुढे बोलताना सांगितलं की, "कामधेनू इंटरनॅशनल प्रॉडक्शन्सनं 'गोदान' नावाचा एक प्रेरणादायी चित्रपट तयार केला आहे, जो आपली भारतीय संस्कृती, विज्ञान आणि संवेदनशीलता दर्शवितो, हे खूप आनंददायी आहे. प्रत्येक भारतीयानं हा सिनेमा पाहिलाच पाहिजे, कारण गायीचा उल्लेख केवळ हिंदू धर्मात, वेदांमध्ये आणि पुराणांमध्येच नाही तर, बायबल आणि कुराणमध्येही आहे. मी दोन्ही वाचलंय..." 

"बायबल किंवा कुराणमध्ये गोहत्येचं अजिबात समर्थन केलेलं नाही... सर्व धर्मांमध्ये गायीला आईसारखा दर्जा देण्यात आलाय, त्यामुळेच तिची हत्या करण्यास मनाई केली पाहिजे..."

Continues below advertisement

"मी भगवान विष्णूंचा दहावा अवतार, कल्कीला पाहिलंय..."

ममता कुलकर्णी यांनी पुढे बोलताना दावा केला की, मी भगवान विष्णूंचा दहावा अवतार कल्कीला पाहिलंय आणि आता असा काळ येतोय, जेव्हा गायी दूध देणं थांबवतील. आज आपण ज्याप्रमाणे पाण्याचा अपव्यय करतोय, तसेच गाय मातेचंही होत आहे. ज्यांचे डोळे अद्याप उघडलेले नाहीत, त्यांनी ते वेळीच ओळखावं नाहीतर खूप उशीर होईल..." त्यासोबतच ममतांनी त्यांच्या आध्यात्मिक अनुभवांचाही उल्लेख केला. 25 वर्षांच्या तपस्या आणि तपश्चर्येनंतर त्या समाधीच्या अवस्थेत पोहोचल्याचे त्यांनी सांगितलं.

ममता कुलकर्णी म्हणाल्या की, "हा सिनेमा तुम्हाला विचार करायला लावेल. गाय ही आई आहे, ती दूध देते. प्रत्येक धर्मात आईला उच्च स्थान दिलं आहे. इस्लाममध्येही जेव्हा अल्लाहला विचारण्यात आलं की, त्याच्यानंतर कोणाला महत्त्व द्यावं, तेव्हा त्यांनीही आईचाच उल्लेख तीन वेळा केला. आपण मानसिकदृष्ट्या विकृत झालो आहोत. श्रीमद्भगवद्गीतेत लिहिलंय की, आपण जे पेरतो तेच आपण उगवू... आज युद्ध आणि दुष्काळ हे सर्व आपल्या कर्मांचे परिणाम आहेत. त्यामुळे गायीला इजा करण्यापूर्वी लोकांनी दहा वेळा विचार करावा."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

ममता कुलकर्णींचा महामंडलेश्वरपदाचा राजीनामा; म्हणाल्या, भगवे वस्त्र घालणे म्हणजे भाजप वा, कुणाचा एजंट होणे नाही