Mamta Kulkarni On Aamir Khan: बॉलिवूडच्या (Bollywood News) कधीकाळच्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक असलेली अभिनेत्री म्हणजे, ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni). 1990 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील (Hinid Films) सर्वात सुप्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक असलेल्या ममता कुलकर्णी यांनी चित्रपटसृष्टीतील त्यांचे काही अनुभव आणि आठवणी जाग्या केल्या आहेत. त्यांनी प्रेमळपणा, वैयक्तिक संबंध आणि कोणतंही विभाजन नसलेला काळ आठवला. ममता कुलकर्णी यांनी अनेक वर्षांपूर्वी बॉलिवूड सोडलं. 2025 मध्ये त्या भारतात परतली आणि किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर बनल्या. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत ममता कुलकर्णी यांनी त्या काळात चित्रपटांच्या सेटवरचे त्यांचे अनुभव आणि आठवणी सांगितल्या आहेत.

"आमिर खान माझ्या बेडरुममध्येच कपडे बदलायचा..."

'बाजी' चित्रपटाच्या चित्रीकरणाची आठवण करून देताना, ममता कुलकर्णी यांनी काही आठवणी सांगितल्या, जिथे प्रोफेशनल आणि पर्सनल स्पेस अनेकदा एकमेकांशी जोडल्या जात असत. आमिर खानसोबतच्या त्यांच्या संबंधांबद्दलही ममता कुलकर्णी यांनी भाष्य केलं. 

ममता कुलकर्णी म्हणाल्या की, त्या काळात शूटिंगमध्ये आजच्यासारख्या भव्य पायाभूत सुविधांचा अभाव होता. व्हॅनिटी व्हॅन कमी होत्या आणि कलाकार अनेकदा मूलभूत सुविधांसाठी एकमेकांवर अवलंबून असायचे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, "बाजी'च्या शूटिंगदरम्यान, आमिर खान अनेकदा थेट लोखंडवाला इथल्या त्यांच्या घरी यायचा आणि त्यांच्या बेडरूममध्येच कपडे बदलायचा. एवढंच काय तर, पॅक-अप केल्यानंतर पुन्हा ते घरी यायचे आणि स्वयंपाकघरात चहा बनवायचे..."

एका एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ममता कुलकर्णी म्हणाल्या की, "बघा, मला खूप आनंद आहे की, मला 1990 च्या दशकात काम करता आलं. मी आमिर खानसोबत काम केलंय, मी शाहरुख खानसोबत काम केलंय... आम्ही कधीही एकमेकांच्या धर्माकडे पाहिलं नाही. खरं सांगायचं तर, मी आता काय म्हणू?" पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "चित्रपटाच्या सेटवर आजच्यासारख्या सुविधा नव्हत्या आणि कलाकार अनेकदा एकमेकांच्या घरी तयार व्हायचे आणि नंतर शूटिंगसाठी निघून जायचे..."

ममता यांनी स्पष्ट केलं की, भारताबाहेर, विशेषतः आमिर खान आणि शाहरुख खानसोबतच्या जागतिक दौऱ्यांदरम्यान, जिथे इंडस्ट्रीमध्ये वाटणारा उबदारपणा आणि परस्पर आदर जाणवायचा, अशी मैत्रीची भावना दिसून यायची. अभिनेत्री म्हणाली की, "जेव्हा आम्ही आमिर खान आणि शाहरुख खानसोबत देशाबाहेर शुटिंगसाठी जायचो, तेव्हा आम्ही एकमेकांच्या घरी असायचो, कोणीतरी चहा बनवायचं, तर कुणी जेवण बनवायचं..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Mamta Kulkarni On Lord Vishnu 10th Avatar Kalki: 'मी भगवान विष्णूंचा दहावा अवतार कल्कीला पाहिलंय'; ममता कुलकर्णींचा दावा, गाईबाबत म्हणाल्या...