Kalamkaval Box Office Collection: सध्या संपूर्ण देशभरात फक्त आणि फक्त अक्षय खन्नाच्या (Akshaye Khanna) रणवीर सिंहची (Ranveer Singh) चर्चा सुरू आहे. प्रत्येकजण या फिल्मचं कौतुक करतोय. 'धुरंधर' (Dhurandhar) बॉक्स ऑफिसवर (Dhurandhar Box Office Collection) तुफान कमाई करतोय. तरीसुद्धा अजूनही या फिल्मनं आपलं बजेट वसूल केलेलं नाही. पण, 'धुरंधर'च्या या वादळात एका 74 वर्षांच्या अभिनेत्याची फिल्म ब्लॉकबस्टर ठरतेय. आम्ही ज्या अभिनेत्याबाबत बोलतोय, तो म्हणजे, साऊथ सुपरस्टार 'मामूट्टी' (Mammootty). मल्ल्याळम सिनेमाचा (Malayalam Cinema) सुपरस्टार मामूट्टीची नवी फिल्म 'कलमकावल' (Kalamkaval Film) सध्या थिएटर्समध्ये तुफान गाजतेय. 

Continues below advertisement

पाचच दिवसांत फिल्म ब्लॉकबस्टर 

5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या या क्राइम मिस्ट्री थ्रिलरनं अवघ्या पाच दिवसांत जगभरात 50 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ट्रॅकर सायनिकच्या मते, 'कलामकावल' ब्लॉकबस्टर होण्याच्या मार्गावर आहे. आयएमडीबीच्या मते, अंदाजे 25 कोटी रुपयांच्या बजेटसह या मामूटीच्या सिनेमानं आधीच त्याच्या बजेटच्या दुप्पट कमाई केली आहे. 'कलामकावल'ची सर्वात मोठी ताकद म्हणजे, त्याची आकर्षक कथा. समीक्षकांच्या पॉझिटिव्ह रिव्यूमुळे मोठी गर्दी झाली आहे.

मामूटीच्या फिल्मचे बॉक्स ऑफिसचे आकडे काय सांगतात? 

  • ओपनिंग डे : 5 कोटी
  • शनिवार : 5.5 कोटी
  • रविवार : 6 कोटी
  • सोमवार : 2.9 कोटी
  • मंगळवार : 2.8 कोटी

'कलामकावल'ला कुठे-कुठे मिळतेय पसंती? 

'कलामकावल'चं भारतातलं नेट कलेक्शन 22.20 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. तर, जगभरात सिनेमाच्या कलेक्शननं 50 कोटींचा जादुई आकडा गाठला आहे. महत्त्वाचं म्हणजे, हा मल्याळम सिनेमा केरळपुरता मर्यादित नाही. बंगळुरू, चेन्नई, मुंबई आणि दिल्ली-एनसीआर सारख्या प्रमुख शहरांमध्येही या सिनेमाचे शो हाऊसफुल्ल सुरू आहेत. तरीही, केरळमध्ये या सिनेमाला सर्वाधिक प्रेम मिळतंय. कोचीमध्ये सरासरी ऑक्युपन्सी 61.25 टक्के, कोल्लम 52 टक्के, अलाप्पुझा 46.25 टक्के आणि कोट्टायम 39.75 टक्के होती. संध्याकाळ आणि रात्रीचे शो जवळजवळ हाऊसफुल्ल आहेत. पाचव्या दिवशीही, मल्याळम सरासरी ऑक्युपन्सी 32.14 टक्क्यांवर पोहोचली आहे,  जी कोणत्याही प्रादेशिक सिनेमासाठी एक प्रभावी आकडा आहे. प्रेक्षकांचं प्रेम आणि सकारात्मक रिव्यू पाहता, 'कलामकावल' दुसऱ्याच आठवड्याच्या शेवटी आणखी मोठी कमाई करण्यासाठी सज्ज आहे. मामूटीच्या चाहत्यांसाठी ही वर्षातील सर्वात मोठी भेट आहे. 

Continues below advertisement