Bigg Boss 19 : बिग बॉस 19चा आज ग्रँड फिनाले होणार आहे. ऑगस्टमध्ये सुरू झालेला बिग बॉसचा हा सीजन संपेल. सध्या या रियालिटी शोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. नुकतंच बिग बॉसच्या घरातून मालती चहरचं (Malati Chahar)एव्हिक्शन झालं. एव्हिक्शनच्या आधीच मालतीचं स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे (Pranit More)सोबत जोरदार भांडण झालं. आणि त्यानंतर मालतीने कुणालाही गुडबाय न म्हणता घर सोडण्याचा निर्णय घेतला. मालती घरातून बाहेर पडतानाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मालती प्रणिती न बोलता निघून गेल्यानंतर प्रणितला वाईट वाटलं. ' हे असं संपणार नाही ' असं म्हणत तो रडल्याचंही दिसलं. घराच्या बाहेर आल्यानंतर तिने प्रणितने तिला लाथ मारली होती. त्यामुळे तो इतक्यावेळा सॉरी म्हणत असल्याचा खुलासा केला.
नेमकं काय म्हणाली मालती चाहर?
न्यूज 18ला दिलेल्या मुलाखतीत मालतीला विचारलं गेलं की शो संपल्यानंतर ती प्रणीतशी बोलणार का? त्यावर मालती म्हणाली,“खरं सांगू, मी घराबाहेर आले तेव्हा आमचं भांडण झालं होतं. मला त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती कारण मी नेहमी त्याचा सपोर्ट केला होता. मी गौरव खन्नाला काहीतरी टोमणा मारत होते, पण प्रणीत मधेच उडी मारून माझीच नाचक्की करू लागला. तो नेहमी त्याच्या शोचं नाव सांगत असतो आणि त्याच्यावरून असं वागतो.”
मालती पुढे म्हणाली,“या सगळ्या मस्करीत त्यानं मला लाथ मारली. माझ्या हिपवर बसली ती. मी तिथे काहीच बोलले नाही. मेकर्स हे दाखवणारही नव्हते कारण पाहायला खूपच चुकीचं वाटलं असतं. त्यामुळे मी त्याला सांगितलं की असं करणं बरोबर नव्हतं. त्यालाही त्याची चूक समजली म्हणूनच तो सतत माफी मागत होता. खरं तर मला माहीत असतं की एव्हिक्शन अगदी या भांडणानंतरच होणार आहे, तर मी किमान नीटपणे गोष्ट संपवली असती.”
शो नंतर मैत्री टिकणार का?
मालतीला विचारलं की शोच्या बाहेर ती प्रणीतशी संपर्कात राहणार का? यावर ती म्हणाली, “घरात कुणालाच मी फारशी आवडत नव्हते, त्यामुळे तिथून काही आठवणी घेऊन जाण्यासारखं काही नाही. फक्त प्रेक्षकांचं मिळालेलं प्रेम हेच माझ्यासाठी पॉझिटिव्ह आहे. घरातल्या लोकांना आता मी मेंटली डील करू शकत नाही. दोन महिन्यांनी अखेर मला स्वतःसारखं वाटतंय आणि मी अजिबात त्यांच्याबद्दल विचार करू इच्छित नाही. शोमध्ये जे काही केलं ते फक्त प्रेक्षकांसाठी आणि मेकर्ससाठी.”
मालती घराबाहेर गेल्यानंतर प्रणीत कॅमेऱ्यासमोर भावूक झाला होता. त्यानं पुन्हा एकदा तिला माफी मागितली आणि अमाल मलिकनं त्याला समजावलं. मालतीच्या एव्हिक्शननंतर ‘बिग बॉस 19’चे टॉप पाच फायनलिस्ट घोषित झाले. गौरव खन्ना, अमाल मलिक, प्रणीत मोरे, तान्या मित्तल आणि फरहाना भट्ट. शोचा ग्रँड फिनाले रविवार, 7 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.