Malaika Arora : बॉलिवूडची ‘मुन्नी’ अर्थात अभिनेत्री मलायक अरोरा (Malaika Arora) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिची फॅशन स्टाईल, तर कधी अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सोबतच्या नात्यामुळे ती प्रसिद्धी झोतात असते. सध्या ती प्रोफेशन लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. मलायकाने 1998मध्ये अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) याच्याशी लग्नगाठ बांधली होती. मात्र, काही वर्षांपूर्वी दोघांचा घटस्फोट झाला. या जोडप्याला एका मुलगा देखील आहे. आता मलायका पुन्हा एकदा चर्चेत आलीये, ते तिच्या जुन्या वक्तव्यामुळे...


मलायकाने ‘छैया छैया’, ‘मुन्नी बदनाम’ या या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले आहे. इतकी प्रसिद्ध असूनही अभिनेत्रीवर अनेकदा टीका केली गेली. अशाच एका टीकेला मलायकाने उत्तर देताना मलायका संतापली होती.


मी सेल्फमेड...


एकदा अभिनेत्री राखी सावंतने देखील मलायका आरोरावर वक्तव्य केले होते, जे ऐकून मलायका चांगलीच संतापली होती. ‘मलायका केवळ खान कुटुंबातून असल्यामुळेच, लोक तिला थेट ‘आयटम गर्ल’ म्हणत नाहीत. मात्र, तिला दुसरी कोणतीचं काम मिळत नाही, हेही सत्य आहे’, असे राखी सावंत म्हणाली होती.


राखी सावंतच्या या वक्तव्यावर मलायका अरोरा चांगलीच संतापली होती. राखीला उत्तर देताना मलायका म्हणाली, ‘असं असेल, तर मी सलमान खानच्या प्रत्येक चित्रपटात दिसायला हवं. ज्या चित्रपटात तो विशेष भूमिका साकारतो, त्यात तर मी असलाच हवं ना? मी सेल्फमेड व्यक्ती आहे. मला सलमान खानने बनवलेलं नाही.’ यानंतर ती चांगलीच भडकली होती.


सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. तर, अरबाज खान देखील एका मॉडेलला डेट करत आहे. आता अरबाज आणि मलायका वेगळे झाले असले, तरी मुलाच्या निमित्ताने ते दोघेही एकत्र दिसतात.


हेही वाचा :