Main Vapaas Aaunga: इम्तियाज अली दिग्दर्शित 'मै वापस आऊंगा' (Main Vapaas Aaunga) चित्रपट केवळ वर्ड ऑफ माऊथमुळे चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. दिलजीत दोसांझ, नसीरुद्दीन शाह आणि शर्वरी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'मैं वापस आऊंगा' हा बहुप्रतीक्षित चित्रपट आता ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थिएटरमध्ये चांगली कमाई आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळवल्यानंतर हा चित्रपट आता OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. 

Continues below advertisement

हा चित्रपट 12 जून 2026 रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित झाल्यानंतर त्याला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आणि तो हिट ठरला. विशेष म्हणजे, 2026 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत त्याने आठवे स्थान पटकावले आहे.

ओटीटीवर कधी आणि कुठे पाहता येणार?

'मैं वापस आऊंगा' हा चित्रपट 7 ऑगस्ट 2026 पासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर प्रेम, विरह, आठवणी आणि मानवी नात्यांच्या भावनिक प्रवासावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना एक हृदयस्पर्शी अनुभव देतो.

Continues below advertisement

'मैं वापस आऊंगा'ची कथा काय आहे?

या चित्रपटात स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या एका वृद्ध व्यक्तीची कथा दाखवण्यात आली आहे. त्याला आपल्या बालपणीच्या पाकिस्तानमधील घरात परत जाण्याची तीव्र इच्छा असते. त्याचा नातू त्याला या प्रवासात साथ देतो आणि 1947 च्या भारताच्या फाळणीदरम्यान मागे राहिलेल्या एका अपूर्ण प्रेमकथेचा आणि भूतकाळातील आठवणींचा शोध घेतो. ही कथा प्रेम, विरह आणि इतिहासाच्या जखमांना भावनिक स्पर्श करणारी आहे.

'मैं वापस आऊंगा' स्टारकास्ट

चित्रपटात दिलजीत दोसांझ यांनी निर्वैर ग्रेवाल, नसीरुद्दीन शाह यांनी इशार सिंह ग्रेवाल, तर शर्वरी वाघने जिया/अफसाना ही भूमिका साकारली आहे. याशिवाय बनिता संधू (कावेरी), कुमुद मिश्रा (BSF प्रमुख), रजत कपूर (इक्बाल ग्रेवाल), डॅनिश पंडोर (अफजल), डॉली आहलुवालिया (कीनूची आजी), मनीष चौधरी (मुजफ्फर अहमदझाई), अंजना सुखानी (अंजना ग्रेवाल) आणि मशहूर अमरोही (सरफराज रहमान) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.