Jay Bhanushali and Mahi Vij End Their Marriage: प्रसिद्ध टीव्ही कलाकार माही विज आणि जय भानुशाली यांनी अलिकडेच काडीमोड घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांचं नातं संपुष्टात येणार असल्याची चर्चा होती. या चर्चांवर आता पूर्णविराम मिळाला आहे. दोघांनी घटस्फोट घेतला असल्याचं जाहीर केलं. दरम्यान, माही आणि जय यांचं नातं अधिकृतपणे संपले असल्याचं जाहीर होताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अनेक तर्क वितर्क लावले. दोघांच्या पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अशातच नेटकऱ्यांच्या तर्क वितर्कांना आळा घालण्यासाठी माहीनं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर तिनं दोघांचा एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच तिनं फोटोला कॅप्शन देखील दिलं आहे. घटस्फोटानंतरची माहीची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
माही विज आणि जय भानुशाली यांनी संसाराला पुर्णविराम दिला. त्यानंतर दोघांच्या मुलाखतीचे अनेक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाले. नेटकऱ्यांनी या व्हिडिओंद्वारे अनेक तर्क वितर्क लावले. यामुळे समाजमाध्यमांवर चर्चांना उधाण आलं. या नेटकऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी माहीनं एक पोस्ट शेअर केली. तिनं दोघांचा फोटो पोस्ट केला. दोघांनीही मास्क घातलेले आहे. फोटो शेअर करत माहीनं कॅप्शनमध्ये लिहिले की, "हो, हे आम्हीच आहोत.. लाईक्स आणि कमेंट्ससाठी मीडिया काहीही करेल. मी पोस्ट करत असलेल्या स्टोरीज जयसाठी नव्हत्या. कृपया त्यात गोंधळ घालू नका", अशी पोस्ट तिनं सोशल मीडियात शेअर केली.
माहीनं नेमकी कोणती पोस्ट शेअर केली होती?
माहीनं काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं की, "मला माझ्या मुलांवर प्रेम करणारे लोक खूप आवडतात. माझ्या ह्रदयात त्यांचे विशेष स्थान आहे", असं तिनं पोस्टमध्ये लिहिलं होतं. तर, दुसऱ्या पोस्टमध्ये तिने, "अशा प्रकारची व्यक्ती बना, जी लोकांना दयाळू ह्रदय आणि चांगली ऊर्जा असलेल्या लोकांवर विश्वास ठेवण्यास प्रेरित करेल". तर, आणखी एका पोस्टमध्ये तिनं, " समोरचा व्यक्ती तुमच्यासारखा वागला, तर तुम्हाला त्याचा त्रास होईल. तुम्ही प्रचंड नाराज व्हाल", असं माहीनं पोस्टमध्ये म्हटलं.
जय भानुशाली आणि माही विज बरेज वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. नंतर दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. 2010मध्ये दोघांचे लग्न झाले होते. दोघांमधील केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली होती. दोघांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. दोघांना एक मुलगी आहे. तसेच दोघांनी मिळून एका मुलीला दत्तक घेतले होते.