Mahesh Tilekar : मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tilekar) सोशल मीडियावर (Social Media) सातत्याने सक्रिय असलेले पाहायला मिळतात. राजकारण, सिनेमा याबाबत ते फेसबुकच्या (Facebook) माध्यमातून व्यक्त होतात. सध्या त्यांची एक फेसबुकवर तुफान व्हायरल झाली. डिझायनर तरुणी कष्टाने करियरसाठी झटत असताना आणि प्रामाणिक काम करत असताना मराठी कलाकारांनी तिला अतिशय वाईट वागणूक दिली, असा दावा दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यामातून केलाय. कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी डिझायनर तरुणीला मराठी कलाकारांचे उंबरे झिजवावे लागेल, तरीही मानधन मिळालेच नाही, असे दिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tilekar) म्हणाले आहेत. 


डिझायनर तरुणीचा विषय काय?


मुंबई बाहेर राहणारी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणी मराठी कलाकारांसाठी स्टायलिश आणि डिझायनर म्हणून काम करत होती. तरुणी मराठी कलाकरांना  ड्रेस डिझायनरकडून वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे घेऊन ते त्या त्या कलाकारांच्या गरजेप्रमाणे फुकट उपलब्ध करुन द्यायची. असा कष्टाळू तरुणीला मराठी कलाकारांनी घरी गेल्यानंतर पाणी देखील विचारले नाही. शिवाय, तिच्या कष्टाचे पैसे देखील दिले नाहीत, असा दावा महेश टिळेकर यांनी केलाय. शिवाय महेश टिळेकर यांनी दिलेल्या कामांचे तरुणी व्हॉट्सॲपवरुन अपडेट देत होती. कामाशी प्रामाणिक होती, असेही टिळेकर यांनी स्पष्ट केलंय. 


महेश टिळेकर काय म्हणाले? 


"मराठी मनोरंजन क्षेत्रातील काही कलाकारांनी, स्वतःला  स्टार सुपरस्टार समजणाऱ्या सो कॉल्ड काही नट नट्यांनी  सभ्यता, संस्कृती लाज लज्जा सोडून दिलेली आहे. सोशल मीडियावर एअरपोर्टवर पिझ्झा बर्गर खातानाचे आणि स्टार बक्सची कॉफी पितानाचे फोटो पोस्ट करून, तर अधून मधून घरातील  वैभवाचे फोटो काढून श्रीमंतीचे बडेजाव करणारा हा नट प्रत्येकक्षात इतका भिकारी असावा! बरं याने नंतर  डिझायनर तरुणीला पैसे दिलेच नाही. असाच अनुभव डिझायनर तरुणीला स्वतःला सौंदर्य सम्राज्ञी समजणाऱ्या मराठीतील स्टार अभिनेत्रीचा आला."


'कलाकारांच्या वाईट वागणूकीमुळे तरुणीने डिझायनरचे काम सोडले'


मराठी कलाकारांचे असे चित्र विचित्र अनुभव आले, दुय्यम वागणूक मिळाली. काम करुनही कष्टाचे पैसे मिळत नसतील आणि मानसिक छळ होत असेल तर कशाला डिझायनरचे काम करायचे? असे डिझायनर तरुणी महेश टिळेकर यांनी म्हणाली. ज्या हिंदीतील दोन कलाकारांच्या साठी मी तिला ड्रेस बनवायला सांगितले होते. त्यांचा मात्र तिला चांगला अनुभव  आल्याचे तरुणीने सांगितले, असे अनेक दावे दिग्दर्शन महेश टिळेकर यांनी केले आहेत. 



इतर महत्वाच्या बातम्या 


Priyadarshini Indalkar : 'त्या' दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध; महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकर भडकली