Mahesh Manjrekar & Salman Khan: सलमान खान रात्री 3 वाजता महेश मांजरेकरांच्या घरी गेला अन् म्हणाला, 'तू मला शिव्या दे'; नक्की काय घडलं?
सलमान खानसोबतच्या नात्याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांनी सलमानबद्दल अनेक किस्से सांगितले, विशेषत: त्यांच्या आजारपणाच्या काळातील एक भावनिक प्रसंग शेअर केला.

Mahesh Manjrekar on Salman Khan: मराठी चित्रपटांपासून बॉलीवुडमधील दिग्गजांमध्ये असलेलं नाव म्हणजे महेश मांजरेकर. (Mahesh Manjrekar) पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपताच्या निमित्ताने ते पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार आहेत. सध्या मराठी चित्रपट, त्यांचा नावांवरून होणारे वाद, त्यामागचं राजकारण यामुळे निर्माते आणि दिग्दर्शक वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत असताना दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी माझा कट्ट्यावर हजेरी लावली . यावेळी राजकारण आणि सिने विश्वातली अनेक गुपित उघड करणाऱ्या संवाद त्यांच्यासोबत झाला . सलमान खानसोबतच्या नात्याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांनी सलमानबद्दल अनेक किस्से सांगितले, विशेषत: त्यांच्या आजारपणाच्या काळातील एक भावनिक प्रसंग शेअर केला. (Salman Khan)
आजारी असताना रात्री 3 वाजता सलमान खान घरी आला अन्
महेश मांजरेकर म्हणाले, “माझा वाढदिवस होता, कॅन्सरचं ऑपरेशन झालं होतं. अंगावर सगळ्या ट्युब्स होत्या, बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. त्या वेळी 'इंडियन आयडॉल'चे गायक माझ्या घरी आले होते. त्यामधला पवनदीप हा माझा मित्र आहे, त्याने सगळ्यांना आणलं आणि त्यांनी घरात छान गाणी म्हटली.” यानंतर मांजरेकर यांनी सांगितलं की, “त्या रात्री सलमान खान रात्री तीन वाजता माझ्या घरी आला. मला बोलवलं नाही म्हणाला. तो खरोखर मित्र आहे. आम्ही एकत्र शेवटचा चित्रपट केला होता, पण त्यानंतर मी ठरवलं की पुन्हा सलमानचा चित्रपट करणार नाही.”
सलमान माणूस म्हणून ग्रेट
ते पुढे म्हणाले, “मी थोडासा तापट आहे, त्यामुळेच कदाचित तो रात्री तीन वाजता आला आणि म्हणाला ,‘मला शिव्या दे.’ मी त्याला सांगितलं, ‘मी तुला शिव्या दिलेल्या नाहीत, पण तुझ्यातला दिग्दर्शक माझ्यात हस्तक्षेप करू नये. तू मला चित्रपट दिलास, तेवढंच पुरेसं आहे.’” महेश मांजरेकर यांनी शेवटी सांगितलं, “पण सलमान माणूस म्हणून ग्रेट आहे. कधीही कुणी बोलवलं, कुठे जायचं म्हटलं तर तो नक्की येतो. तो माणूस म्हणून खूप मोठा आहे.”
सलमान खानला पाकिस्तान सरकारने केलं दहशतवादी घोषित
बॉलिवूड अभिनेता भाईजान सलमान खानला (Salman Khan Saudi Arabia speech) पाकिस्तान सरकारने दहशतवादी घोषित केलं आहे. सलमान खानचं नाव दहशतवाद विरोधी कायद्याच्या ‘चौथ्या अनुसूची’त (4th Schedule) समाविष्ट करण्यात आलं आहे. सलमान खानने सौदी अरेबियातील कार्यक्रमात दिलेल्या एका वक्तव्यामुळे पाकिस्तानने ही कारवाई केली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान सलमानवर कायदेशीर कारवाई करू शकतो.


















