Mahesh Manjrekar On Film Industry: सध्या बऱ्याच क्षेत्रात आर्टिफिशअल इंटिलिजन्स (Artificial Intelligence) इंडस्ट्रीवर वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतंय. बऱ्याच गोष्टींसाठी Al चा वापर होतोय. अगदी साध्यासुध्या गोष्टींसाठीही सर्रास एआय वापरलं जातंय. अशातच आता याच एआयबाबत एक भितीदायक भाकीत बॉलिवूडसह, मराठी इंडस्ट्रीत सक्रिय असलेले अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी केलंय. तसेच, हे भाकीत करताना त्यांनी याचं स्पष्टीकरणंही दिलंय. पुढच्या दीड वर्षात इंडस्ट्री संपेल, असं महेश मांजरेकर म्हणाले आहेत. तसेच, Al जे व्हिज्युअल्स करतं, ते कॅमेऱ्यावर करणं अजिबात शक्य नाही, असं महेश मांजरेकर म्हणाले आहेत.
महेश मांजरेकर नेमकं काय म्हणाले? (Mahesh Manjrekar On AI)
एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर बोलताना अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले की, "माझं मत आहे की, दीड वर्षानंतर सिनेमा बंद होईल, बंद म्हणजे, बंद... Alनं एवढं टेकओव्हर केलंय ना, ते व्हिज्युअल्स कॅमेऱ्यावर करणं शक्यच नाही. तुम्ही कितीही चांगले व्हिएफएक्स केले, तरी तुम्ही ते व्हिज्युअल्स कॅमेऱ्यावर देऊच शकत नाही... मी घरबसल्या बसल्या टायटॅनिकमधली लायटिंग, लिओनार्डो डिकॅप्रियोपेक्षा चार पटींनी सुंदर हिरो... यासह मी सिनेमा बनवला, तर मी बनवू शकतो..."
"मी 'महाभारत'चा ट्रेलर पहिला, अक्षरशः डोळे दीपवणारा ट्रेलर आहे. जर हे सगळं एका क्लिकवर होणार असेल, तर लोक कलाकारांसाठी का पैसे खर्च करतील. अर्थात, AI वापरण्यासाठीसुद्धा हुशारी लागेलच. मी सहा महिन्यांपूर्वी पाहिलेला AI आणि आताचं AI यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. ज्या दिवशी त्यांच्या हाती सिनेमा बनवण्याचा कोड लागेल. त्या दिवशी आपण संपणार. रोज 10 हजार सिनेमे बनतील आणि याला काही खर्चही येत नाही."
पुढे बोलताना महेश मांजरेकर म्हणाले की, "माझ्या एका मित्रानं AI च्या मदतीनं अॅड फिल्म केली आणि त्याला खर्च आला फक्त दोन हजार रुपये... त्यामुळे अनेक लोक AI वर सिनेमे बनवणार; पण ते बघणार कोण? त्यामुळे येत्या दीड वर्षात सिनेमे बंद होणार हे खूपच धोकादायक आहे. त्यामुळे सगळ्ळ्यांनी आता गुपचूप नाटकांकडे वळलं पाहिजे. येत्या दीड वर्षात सिनेमा बंद होणार, हे माझं भाकीत आहे..."
पाहा संपूर्ण 'माझा कट्ट':