Mahesh Limaye on Salman Khan: प्रसिद्ध दिग्दर्शक आणि भारतीय सिनेमॅटोग्राफर महेश लिमये आपल्या प्रोजेक्टसाठी ओळखले जातात.  भाईजानचा 'दबंग' हा सिनेमा प्रचंड गाजला. या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांनी अलिकडेच सलमान खान आणि 'मुळशी पॅटर्न' यासंदर्भात एक किस्सा सांगितला.  'मुळशी पॅटर्न' हा सिनेमा पाहत असताना सलमान खानची काय रिअॅक्शन होती? याचा खुलासा महेश लिमये यांनी अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत केला. तसेच सलमान खानला कोणता पदार्थ आवडतो? याबद्दलही त्यांनी खुलासा केला. 

Continues below advertisement

सलमान खानबाबत महेश लिमये नेमकं काय म्हणाले? (Mahesh Limaye on Salman Khan Dabangg and Mulshi pattern)

'मुळशी पॅटर्न' हा सिनेमा प्रचंड गाजला. प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि अभिनीत 'मुळशी पॅटर्न' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कामगिरी केली. यानंतर, सलमान खानने हिंदीत 'अंतिम: द फायनल ट्रुथ' हा सिनेमा तयार केला. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, सलमान खानने पहिल्यांदा 'मुळशी पॅटर्न' पाहिल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली? याचा खुलासा महेश लिमये यांनी मुलाखतीत केला. 

महेश लिमये यांनी अलिकडेच कलाकृती मीडियाला मुलाखत दिली.  या मुलाखतीत महेश लिमये म्हणाले की, 'सलमान भाई खूप फूडी आहेत. 'दबंग'च्या वेळी वगैरे आम्ही आऊटडोअरला जायचो. तो  मटण, चिकन खातो. एखादा नॉन - व्हेजिटेरियन असेल, तर तो हे पाहून वेडा होईल. सलमान भाईंसोबत अॅडचे शूट वगैरे असलं की, मला विचारतात, काही नवीन आहे का? सिनेमाची स्टोरी वगैरे.  तेव्हा एकदा मी त्यांना 'मुळशी पॅटर्न'बद्दल सांगितलं. तेव्हा सलमान भाई उत्सुकतेने, 'दिखा ना', असं बोलले'.

Continues below advertisement

'सलमान खान अक्षरश: टी- शर्ट खात 'मुळशी पॅटर्न' हा सिनेमा बघत होते.  यानंतर मी प्रवीण तरडेला फोन केला.  'आज भाई फिल्म बघतायेत', असं सांगितलं.  आम्ही एक दिवस 'दबंग' सिनेमाची शूटिंग करत होतो. सेटवर एके दिवशी प्रवीण आला होता.  प्रवीण मला म्हणाला की, 'यांचं जेवण म्हणजे काय आहे रे हे?' मी म्हटलं की, जे दर्दी आहेत ना हे खाणारे, त्या लोकांनीच एन्जॉय करायला हवं', असं महेश लिमये म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Suraj Chavans Daughter Name: सूरज चव्हाणनं आपल्या लेकीचं नाव काय ठेवलं? हटक्या नावाची सोशल मीडियात चर्चा, संजनाच्या मुलीचं इन्स्टाग्राम अकाऊंटही व्हायरल