Mahesh Babu Son Gives Toxic Half Star Rating: साऊथ सुपरस्टार यश (South superstar Yash) याची मुख्य भूमिका असलेला आणि गीतू मोहनदास यांचं दिग्दर्शन असलेल्या 'टॉक्सिक' (Toxic) सध्या भलताच चर्चेत आहे. कित्येकता रिलीज डेट बदलली आणि चाहत्यांची उत्सुकता ताणली, पण रिलीजच्या आधी जेवढी चर्चा रंगली, तेवढा चाहत्यांच्या पसंतीला उतरला नाही 'टॉक्सिक' (Toxic Film). अनेकांनी सिनेमा म्हणजे, टॉर्चर आहे, असं म्हटलंय. तर, कित्येक चाहत्यांनी सिनेमा खूपच किळसवाणा असल्याचं सांगितलंय. पण, चाहत्यांचा संमिश्र प्रतिसाद असूनही सिनेसृष्टीतील दिग्गजांनी 'टॉक्सिक'ला पाठीशी घातलंय. पण, याला अपवाद ठरलाय सुपरस्टार महेश बाबूचा मुलगा, गौतम घट्टामनेनी (Gautham Ghattamaneni). यानं चर्चेत असलेल्या काही सिनेमांना रेटिंग देऊन सर्वांनाच अवाक् केलंय. 

Continues below advertisement

महेश बाबूचा मुलगा, गौतम घट्टामनेनीचं 'लेटरबॉक्सड' (Letterboxd) अकाउंट काही तेलगू चाहत्यांना सापडलंय. या अकाउंटवरुन गौतमनं विविध सिनेमांना दिलेलं रेटिंग समोर आलंय. या यादीत केवळ त्याच्या वडिलांचेच नव्हे, तर यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचाही समावेश होता. विशेष म्हणजे, 26 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या 'टॉक्सिक' सिनेमाला गौतमनं केवळ अर्धा स्टार रेटिंग दिलंय, ज्यामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे.

गौतम घट्टामनेनीनं इतर स्टार्स सोडाच, पण त्याचे सुपरस्टार वडील महेश बाबू यांच्या काही सिनेमांनासुद्धा कमी रेटिंग दिलंय. हे पाहून तर चाहत्यांना धक्काच बसला. चाहत्यांना खूपच आश्चर्य वाटलं. कारण स्वतःच्या वडिलांच्या कामावर तरी तो अशी टीका करणार नाही, असा अनेकांचा समज होता. पण, गौतमनं आपल्या थेट मतांना तो गैरसमज ठरवलाय. पण, गौतमनं दिलेल्या रेटिंगवरुन यावरून आता वाद सुरू झाला असून, काहीजण त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करत आहेत, तर काहीजण त्यानं दिलेलं हे रेटिंग अतिशय कठोर असल्याचं मानत आहेत.

Continues below advertisement

वेगवेगळ्या जॉनरच्या आणि भाषांमधल्या 400 हून अधिक फिल्म्स पाहिल्यात...

गौतम घट्टामनेनीचं 'लेटरबॉक्सड' (Letterboxd) प्रोफाइल हे स्पष्ट करतं की, आपल्या वडिलांप्रमाणेच तो देखील एक सिनेप्रेमी आहे. त्यानं विविध जॉनरच्या आणि भाषांमधल्या 400 हून अधिक फिल्म्स पाहिल्यात. त्याच्या रेटिंग्जवरून हे देखील दिसून येतंय की, सिनेसृष्टीतील व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव तो आपल्या रेटिंग्जवर अजिबात पडू देत नाही.

गौतमनं सुपरस्टार वडील महेश बाबूच्या सिनेमांना दिलाय 1 स्टार (Mahesh Babu Son Gautham Ghattamaneni)

गौतमनं स्वतःच्या वडिलांच्या सिनेमांचीही इतर स्टार्सच्या सिनेमांप्रमाणेच ठरलेल्या मापदंडांमध्ये तुलना केलीय. त्यानं ज्या सिनेमांमध्ये त्याच्या वडिलांनी अत्यंत दमदार भूमिका साकारल्यात त्या महेश बाबूच्या 'पोकिरी' आणि 'नेनोक्कडिने' सिनेमांना प्रत्येकी 5 स्टार्स दिलेत. तर, 'निझाम' आणि 'वमसी' सारख्या इतर सिनेमांना त्यानं प्रत्येकी 2 स्टार्स दिलेत. तसेच, 'ब्रह्मोत्सवम' सिनेमाला केवळ 1 स्टार मिळालाय. 

'द ओडिसी' आणि 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे'साठी 4.5 स्टार्स (Gautham Ghattamaneni Movie Rating)

मात्र, गौतमनं आपली आवड केवळ तेलगू सिनेमांपुरतीच मर्यादित ठेवलेली नाही. 'लेटरबॉक्सड' (Letterboxd) वरील त्याच्या रेटिंग्जवरून विविध भाषा आणि शैलींमधील सिनेमांबद्दलची त्याची विशेष आवड दिसून येते. त्यानं 'शोले', 'प्रोजेक्ट हेल मेरी', 'नाईव्हज आऊट' आणि 'जर्सी' सिनेमांना 5 स्टार्स दिलेत, तर 'द ओडिसी' आणि 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे' यांना 4.5 स्टार्स दिलेत.

'धुरंधर 1'साठी 4 स्टार्स आणि 'धुरंधर 2'साठी 3 स्टार्स

त्यानं इतर अनेक सिनेमांनाही चांगली रेटिंग्ज दिलीत. गौतमनं 'बाहुबली 2'ला 5 स्टार्स दिलेत, तर 'पेल्ली चूपुलु' आणि 'सीता रामम' यांना 4.5 स्टार्स मिळालेत. 'धुरंधर' सिनेमाबाबतचं त्याचं रेटिंग्ज वेगवेगळी होती. त्यानं 'धुरंधर 1'ला 4 स्टार्स आणि 'धुरंधर 2'ला 3 स्टार्स दिलेत. त्याच्या यादीच्या तळाशी असलेल्या 'लायगर' सिनेमाला, 'टॉक्सिक'प्रमाणेच, केवळ अर्धा स्टार मिळाला, तर प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'ला 2.5 स्टार्स देण्यात आलेत.

'टॉक्सिक'ला दिलेल्या अर्ध्या स्टारच्या रेटिंगमुळे सोशल मीडियावर चर्चा

यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाला गौतमनं दिलेल्या अर्ध्या स्टारच्या रेटिंगवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गौतमचं अकाउंट समोर आल्यापासून चाहते त्याच्या रेटिंग्जवर, विशेषतः महेश बाबूचे सिनेमे आणि इतर प्रमुख भारतीय चित्रपटांना दिलेल्या रेटिंग्जवर, चर्चा करत आहेत. यात सर्वात महत्त्वाची आणि चर्चेत असलेली बाब म्हणजे, एखाद्या सुपरस्टारचा मुलगा असूनही सिनेमांबाबतची त्याची मतं या गोष्टीमुळे प्रभावित झालेली नाहीत. अनेकजण त्याच्या या दृष्टिकोनाचं कौतुक करत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Samay Raina Fan Kissed His Photo For 10 Minutes Video: समय रैनाचा क्रेझी फॅन, जमिनीवर झोपला अन् फोटोला 10 मिनिटं किस करत राहिला; VIDEO पाहून स्वतः कॉमेडियन हैराण, म्हणाला, 'FIR करा...'