Maharashtrachi Hasyajatra Holi celebration: मार्च महिना सुरु होताच, सर्वांना  रंगीबेरंगी सण म्हणजेच होळीचे वेध लागते. होळी म्हटलं की, पुरणपोळी अन् विविध रंगांचा वापर करुन खेळला जाणारा सण.  रंगाचा हा खेळ आपण सर्वजण बेभान होऊन खेळतो.  टीव्ही मालिकेतील कलाकारांनीही रंगपंचमीचा आनंद  लुटला आहे.  सोनी मराठी तसेच महाराष्ट्राची हास्यजत्राच्या संपूर्ण टिमनं यंदाची रंगपंचमी उत्साहात साजरी केली.   हास्यजत्रेची रंगपंचमी - खेळ खेळूया  होळीचा..  या विशेष कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले.  या कार्यक्रमानिमित्त सोनी मराठी वाहिनीवरील सर्व कलाकारा एकत्र आले. तसेच त्यांनी उत्साहात हा सण साजरा केला. गाण्याच्या ठेक्यावर गुलाल उधळत कलाकारांनी रंगपंचमी साजरी केली. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  

या रंगतदार सोहळ्याला अनेक कलाकारांची उपस्थिती पाहायला मिळाली.   रंगपंचमीच्या कार्यक्रमात हास्यजत्रामधील कलाकारांचा कल्ला पाहायला मिळाला. अभिनेत्री वनिता खरात हिनं रंगपंचमीचा आनंद लुटला. तर, समीर चौघुले,  नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, श्याम राजपूत, अरुण कदम, निखिल बने, विराज जगताप, ओंकार राऊत आणि दत्तू मोरे यांची होळी निमित्त खास धम्माल - मस्ती पाहायला मिळाली.  हास्यजत्राच्या टिमनं मनसोक्त रंगपंचमीचा आनंद लुटला.  या खास कार्यक्रमात  दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली.  यावेळी कार्यक्रमस्थळी सुंदर रांगोळी काढण्यात आली. तसेच सर्वांना एक गुलाब देण्यात आले.

 गाण्याच्या ठेक्यावर कलाकारांना मनसोक्त डान्स केला. महाराष्ट्राची हास्यजत्रातील कलाकारांनी अक्षरश: कल्ला केला. तर, काही कलाकारांनी पिचकारीचा वापर करुन एकमेकांवर पाणी उधळले. यावेळी अरुण कदम आणि नम्रता संभेरावचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला.  नम्रताने पांढरा ड्रेस त्यावर लाल रंगाची ओढणी घेतली होती. तिनं यावेळी जबरदस्त डान्स केला असल्याचं पाहायला मिळालं. डान्ससह हास्यजत्रा फेम कलाकारांनी विविध गेम्स खेळले. हास्यविनोद करत कलाकारांनी  रंगपंचमीचा आनंद द्विगुणित केला.

 

यावेळी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कलाकारांनी केलेला कल्ला लक्षवेधी ठरत होता.  यावेळी काही प्रेक्षक आणि चाहतेही उपस्थित होते. चाहत्यांनी कलाकारांचा कल्ला व्हिडिओत कैद केला. तसेच व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला. सोनी मराठीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केले आहेत.  या कार्यक्रमाची झलक आपल्याला सोनी मराठीवरही पाहायला मिळाली. या कलाकारांची धम्माल अन् मस्ती आपल्याला सोमवारी आणि मंगळवारी  रात्री 9 वाजता सोनी मराठीवर पाहायला मिळेल.