Samir Choughule On Sachin Tendulkar: 'सचिन तेंडुलकरांसाठी मी उपवास केलेत...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंचा 'तो' किस्सा, क्रिकेटच्या देवाला पाहून ढसाढसा रडला अभिनेता
Samir Choughule On Sachin Tendulkar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेते समीर चौघुले यांनी नुकतीच 'इसापनीती टॉक्स'ला मुलाखत दिली. मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. याच मुलाखतीत बोलताना त्यांनी सचिन तेंडुलकरांसोबतची फॅन मूव्हमेंट शेअर केली.

Samir Choughule On Sachin Tendulkar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) टेलिव्हिजनवरचा (Television Show) अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम. या कार्यक्रमासह यातल्या कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलंय. कित्येकजण या कलाकारांचे स्किट्स पाहून पोट धरुन हसतात आणि आपल्या आयुष्यातली दुःख विसरतात. या कार्यक्रमातील असाच एक कलाकार म्हणजे, समीर चौघुले. अल्पावधीतच आपल्या अभिनयानं आणि कॉमिक टायमिंगनं वेगळी जागा निर्माण केलीय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना समीर चौघुले यांनी एक धमाल किस्सा सांगितला. या मुलाखतीत समीर चौघुले यांनी सचिन तेंडूलकरांबाबतचा एक किस्सा सांगितला. तसेच, सचिन तेंडुलकर माझ्यासाठी देव आहेत, मी त्यांच्यासाठी उपवास केलेत, असं वक्तव्यही केलंय.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेते समीर चौघुले यांनी नुकतीच 'इसापनीती टॉक्स'ला मुलाखत दिली. मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. याच मुलाखतीत बोलताना त्यांनी सचिन तेंडुलकरांसोबतची फॅन मूव्हमेंट शेअर केली.
मराठी अभिनेते समीर चौघुले नेमकं काय म्हणाले?
मराठी अभिनेते समीर चौघुले म्हणाले की, "सचिन तेंडुलकर माझ्यासाठी देव आहेत. सचिनसाठी मी उपवास केलेत. मला अजुनही आठवतंय, सेन्चुरिअन पार्कला वर्ल्ड कपची मॅच होती. सचिननं मॅच जिंकून द्यावी, यासाठी मी सकाळपासून पाणी प्यायलो नव्हतो... मी जेव्हा-जेव्हा उपवास केलेत, तेव्हा सचिन सरांनी मॅच जिंकून दिलीय. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की, माझ्या उपवासामुळेच सचिन तेंडुलकरनं मॅच जिंकून दिलीय. आता माझ्या मुलाला क्रिकेटमध्ये काही रस नाही. पण क्रिकेट माझा धर्म होता. क्रिकेटसाठी मी खूप काही केलंय..."
"माझी आणि सचिन तेंडुलकरांची भेट झाली ती, भरत दाभोळकरांचं मी एक नाटक करत होतो, 'तमाशा मुंबई स्टाईल' नावाचं. टाटा एनसीपीला प्रयोग होता. त्यावेळी भरत दाभोळकर आणि विनय एडेकर आमच्या नाटकात होते. विनय दादा सचिन सरांचा खूप चांगला मित्र... त्यानं मला सांगितलेलं की, एकदा मी तुझी तुझ्या देवाशी भेट घडवून देईन आणि त्यानं सचिन सरांना त्या नाटकाच्या प्रयोगाला बोलावलेलं...", असं समीर चौघुलेंनी सांगितलं.
सचिन तेंडुलकरसोबतच्या भेटीचा किस्सा सांगताना समीर चौघुले म्हणाले की, "आयुष्यात मी जेवढा थरथरत नव्हतो, घाबरलो नव्हतो, तेव्हा घाबरलो... मला खूप टेन्शन आलेलं. विनय सरांनी मला सचिनची सरांची BMW गाडी दाखवली. मी त्या गाडीला नमस्कार केला. मी तसा धार्मिक अजिबात नाही, पण सचिन तेंडुलकरांच्या बाबतीत मी प्रचंड आहे... त्या नाटकाला श्रेयस तळपदे पण आलेला. सचिन सरांनी मध्यांतरपर्यंत नाटक पाहिलं. त्यानंतर सचिन सर मला भेटले. 'तुम्ही खूप छान काम करता, मी तुमचा फॅन झालो', अशी कौतुकाची थाप त्यांनी दिली. मी ढसाढसा रडायला लागलो. आमच्या देव्हाऱ्यात सचिन सरांचा फोटो होता...", असं समीर चौघुलेंनी सांगितलं.





















