Vishakha Subhedar On Periods: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमानं सध्या प्रत्येकाच्या मनात घर केलंय. याच कार्यक्रमात झळकणारी सर्वांची आवडती आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे, विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar). कित्येक वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय असलेल्या या अभिनेत्रीनं आपला कॉमेडीचा टायमिंग आणि अभिनय याच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. विशाखा सुभेदार या अभिनयासोबतच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखल्या जातात. सध्या विशाखा सुभेदारचा एक व्हिडीओ चर्चेत आहे, ज्यामध्ये त्यांनी स्त्रियांना येणारी मासिक पाळी  (Periods) आणि देवपूजा (Worship) याबाबत आपले विचार स्पष्ट केले आहेत. 

Continues below advertisement

मासिक पाळी आणि त्या काळातील देवपूजा यांसारख्या सामाजिकदृष्ट्या संवेदनशील विषयावर त्यांनी आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. माझं असं काही नाही की, मासिक पाळीदरम्यान पूजा करायची नाही. मी मानस पुजा करते, असं विशाखा सुभेदार म्हणाल्या आहेत. तसेच, देवानेच तर दिलं आहे. असं कशाला आपण त्याला वाळीत टाकायचं, असंही विशाखा सुभेदार म्हणाल्या.  

अभिनेत्री विशाखा सुभेदार नेमकं काय म्हणाल्या?

अभिनेत्री विशाखा सुभेदार मासिक पाळीबाबत बोलताना म्हणाल्या की, "माझं असं काही नाही की, मासिक पाळीदरम्यान पूजा करायची नाही. मी मानस पुजा करते. म्हणजे देवाला हळदी कुंकु नाही देत. लहानपणापासून आपल्या प्रथेप्रमाणे जे आपल्या डोक्यात रोवलं गेलंय, ते सहज पुसल्या जात नाही..."

Continues below advertisement

"आता मी कामाख्याला जाऊन आले. तिथे तर देवीच त्या अवस्थेतील आहे. तिथे सगळं चालतं. मग ते थोडसं माझ्या डोक्यातलं खोडलं गेलं की नाही, चालतं सगळं. देवानेच तर दिलं आहे. असं कशाला आपण त्याला वाळीत टाकायचं. मग आता ते हळुहळु माझ्या संकल्पनेतून खोडलं गेलंय. पण, तरी मी त्यादरम्यान मानस पूजा करते. मानस पूजा जशी स्वामींची केली जाते. तशी मी सगळ्या देवांची करते...", असं अभिनेत्री विशाखा सुभेदार म्हणाल्या. 

कामाख्या मंदिराबाबत थोडसं...

कामाख्या मंदिर हे आसामची राजधानी गुवाहाटी इथे आहे. शक्तिदेवता सतीचं हे मंदिर आसामची राजधानी दिसपूर इथून 6 किमी अंतरावर असलेल्या नीलांचल पर्वतश्रेणीत आहे. हे देवीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक असून इथली देवी योनी स्वरूपात आहे. हे ठिकाण तांत्रिक सिद्धीचं सर्वोच्च सिद्ध शक्तिपीठ आहे. या भागाला मध्यांचल पर्वत या नावानंही ओळखलं जातं, कारण या ठिकाणी समाधिस्थितीत असलेल्या शंकराला कामदेवानं बाण मारला होता आणि समाधीतून बाहेर आल्यावर शंकरानं त्या कामदेवाला जाळलं होतं. नीलांचल पर्वतावर कामदेवाला पुनः जीवनदान मिळालंय म्हणून या क्षेत्राला कामरूप असंही म्हटलं जातं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Girish Oak On Sachin Pilgaonkar: 'ही चेहरा नसलेली माणसं...'; मराठी अभिनेते गिरिश ओक सचिन पिळगावकरांबाबत नेमकं काय म्हणाले?