Ashok Kharat Case:नाशिकमध्ये अंधश्रद्धेचा बाजार मांडत महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने (Ashok Kharat Case) संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. ज्योतिष शास्त्राच्या नावाखाली या नराधमाने अनेक महिलांची फसवणूक करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. या भोंदू बाबाचे एका मागून एक कारनामे उघड होत आहेत. या प्रकरणातील धक्कादायक पैलू दररोज समोर येत आहेत. महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या प्रकरणाने महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसळली आहे . अनेक सेलिब्रिटी, कलाकार या प्रकरणावर राग व्यक्त करताना दिसतायत.  दरम्यान 'महाराष्ट्राची हास्यजत्रा , फेम अभिनेता श्रमेश बेटकर ( Shramesh Betkar) याने अशोक खरात प्रकरणी एक पोस्ट शेअर करत रोखठोक प्रतिक्रिया मांडली आहे. समोरचा भोंदू आहे म्हणण्यापेक्षा आपण आपला मेंदू गहाण का ठेवतो ? असा सवाल त्याने केलाय. त्याच्या पोस्टवर अनेक जण कमेंट करत प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतायत.

Continues below advertisement

काय म्हणाला श्रमेश बेटकर ?

'साप म्हटलं की चावणारच त्यामुळे समोरचा भोंदू आहे म्हणण्यापेक्षा,आपण आपला मेंदू गहाण का ठेवतो? आपण स्वतःला गंडवून का घेतो ? याचा शोध घेणे जास्त गरजेचे आहे . ' अशी फेसबुक पोस्ट अभिनेता श्रमेश बेटकरने केली आहे. 

Continues below advertisement

काही दिवसांपूर्वीच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा ' या कार्यक्रमाचे दिग्दर्शक व निर्माते सचिन गोस्वामी यांनीही या प्रकरणी उपहासात्मक एक ओळ टाकत आपलं मत मांडलं होतं. 'प्रयत्ने चिंचोकी घासता, लाख ही मिळे .. ' असं त्यांनी म्हटलेलं. अभिनेता अतुल कुलकर्णीनेही यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली. तो म्हणालेला ' पकडले गेले कीच आणि तरच ' भोंदू ' ? त्याआधी ते काय असतात ? आणि जे कधी पकडले जात नाहीत ते ? अशा आशयाची पोस्ट त्याने शेअर केली होती.

अशोक खरात प्रकरणात रोज नवनवे खुलासे

दरम्यान अशोक खरात प्रकरणात अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशोक खरातची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे. ग्राहकांची माहिती गोळा करण्यासाठी अशोक खरात कशा पद्धतीने स्वतंत्र यंत्रणा राबवायचा, त्याच्याकडे येणाऱ्या भोळ्या भाबड्या ग्राहकांची आधीच माहिती कशी मिळवायचा ? नातेवाईक कोण जवळचे मित्र कोण जीवनातील काही चढ-उतार याबाबत तो कशी माहिती जाणून घ्यायचा याचा पोलिसांना अंदाज आहे .याबाबत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. दुसरीकडे अशोक खरात विरोधात एसआयटी lकडे तक्रारींचा पाऊस सुरू आहे .