Maharashtra Epstein Files Teaser:नाशिकचा भोंदू बाबा, अशोक खरात (Ashok Kharat) याचे प्रकरण उघड होताच संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. या प्रकरणाच्या संबंधित अनेक व्हिडीओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाले.  स्वत:मध्ये अद्भुत शक्ती असल्याचं भासवत त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले.  लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवली. तसेच महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं. या प्रकरणी काही राजकीय नेत्यांसोबत अशोक खरातचे काही फोटो समोर आले होते. या प्रकरणाचा भंडाफोड करण्यात आला. अशोक खरातला पोलिसांनी अटक केली असून, तो सध्या तुरुंगात आहे. महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या घटनेवर लवकरच एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स' (Maharashtra Epstein Files) असे चित्रपटाचे नाव असून, या सिनेमाच्या टीझरनेच (Maharashtra Epstein Files Movie Teaser) संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे. दरम्यान, या सिनेमाचा तिसरा टीझर रिलीज झाला असून, या सिनेमात दिग्गज अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave) यांची भूमिका असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या 'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स'च्या तिसऱ्या टीझरची प्रचंड चर्चा होत आहे.

Continues below advertisement

सुबोध भावेंची 'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स'मध्ये एन्ट्री, तिसरा टीझर सोशल मीडियात व्हायरल (Maharashtra Epstein Files Teaser 3 Release Actor Subodh Bhave)

'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स' या बहुचर्चित सिनेमाचा बहुप्रतिक्षित तिसरा टीझर अखेर रिलीज झाला आहे.   या सिनेमाचे दोन टीझर आधी रिलीज झाले होते. या सिनेमाच्या टीझरमुळे प्रेक्षकांची हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. या सिनेमात अभिनेत्री आणि बिग बॉस फेम दिपाली सय्यद यांची महत्त्वाची भूमिका आहे.  तसेच उदय टिकेकर यांचीही  या सिनेमात महत्त्वाची भूमिका असणार आहे. या दोन्ही कलाकारांची झलक या सिनेमाच्या टीझरमधून स्पष्ट झाली. दरम्यान, आता 'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स' या सिनेमाचा तिसरा टीझर रिलीज झाला आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, या टीझरमध्ये सुबोध भावे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

Continues below advertisement

'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स'च्या तिसऱ्या टिझरमध्ये सुबोध भावेंची झलक पाहायला मिळत आहे. या टिझरमध्ये सुबोध भावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेत दिसत असल्याची माहिती आहे. या टिझरमध्ये सुबोध भावे यांचा एक डायलॉग ऐकायला मिळत आहे. प्रसारमाध्यमांसमोर सुबोध भावे म्हणतात की, 'मंत्री असो किंवा आमदार असो. आमच्या पक्षाचा असो किंवा दुसऱ्या पक्षाचा असो. जो कुणी दोषी असेल, त्याला कायद्याच्या चौकटीत यायलाच लागेल. त्याची गय केली जाणार नाही. हा माझा शब्द आहे तुम्हा सर्वांना', असं सुबोध भावे म्हणताना दिसत आहे. या सिनेमाचा टिझर सोशल मीडियात व्हायरल होत असून,   हा बहुप्रतिक्षित चित्रपट 20 नोव्हेंबर 2026 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. 

Swaroop B. Sawant दिग्दर्शित या चित्रपटात दिपाली सय्यद, उदय टिकेकर आणि सुबोध भावे यांची महत्त्वाची भूमिका आहे. आनंदी पिक्चर्स अमरावती आणि सचिन रोडे पाटील प्रस्तुत या सिनेमात आणखी कोणते कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार?  या सिनेमात अशोक खरात यांची भूमिका कोण साकारणार? हे अजूनही गुलदस्त्यात असून, हे लवकरच उघड होईल. 

अशोक खरात प्रकरणात अनेक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आले होते. या प्रकरणात अशोक खरातचा तपास करुन त्याला अटक करण्यात आली आहे. अशोक खरातने भोंदूगिरी,  बनावट रुद्राक्ष, मध विकून  तब्बल 47 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केला होती.  अशी माहिती ईडी तपासातून उघड झाली होती. दरम्यान,  या सिनेमातून आणखी कोणती माहिती उघड होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Sachin Pilgaonkar Ashi Hi BanwaBanwi: 'मला ओळखलंत का सासूबाई?'; 'अशी ही बनवाबनवी'च्या सेटवर सचिन पिळगावकर साडी नेसून सुप्रिया पिळगावकरांच्या आईला भेटले, अन् मग...