Monalisa Married Muslim Boyfriend: महाकुंभ मेळ्यातील व्हायरल गर्ल (Mahakumbh Mela Viral Girl) मोनालिसा (Monalisa) गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराजमध्ये (Prayagraj) 2025 मध्ये पार पडलेल्या महाकुंभ (Mahakumbh Mela) मेळ्यादरम्यान, फुलांच्या माळा विकणाऱ्या 'मोनालिसा' या तरुणीनं आपल्या आकर्षक डोळ्यांनी अनेकांना भूरळ घातलेली. तिचा व्हिडीओ व्हायरल होताच, सगळीकडे तिच्याच चर्चा रंगल्या. तेव्हापासूनच ती 'महाकुंभ व्हायरल गर्ल' म्हणून ओळखली जाऊ लागली. काही दिवसांपूर्वी तिनं रुपेरी पडद्यावरही डेब्यू केला. अशातच आता या 'महाकुंभ व्हायरल गर्ल'नं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. तिनं नुकतंच आपला मुस्लिम प्रियकर फरमान खान (Farman Khan) याच्याशी विवाह करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. हा विवाह सोहळा केरळमधील (Kerala) तिरुवनंतपुरमजवळ असलेल्या 'पूवार' इथल्या 'अरुमानूर श्री नैनार देव मंदिरात' पार पडला. मोनालिसा आणि तिचा मुस्लिम प्रियकर फरमान (Muslim Boyfriend Farman) यांच्या विवाह सोहळ्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. 

प्रियकरानं मोनालिसाच्या भांगात भरलं कुंकू 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, मोनालिसानं लाल रंगाची साडी परिधान केल्याचं दिसून येतंय. तिरुवनंतपुरम इथल्या अरुमानूर नैनार मंदिरात, तिचा प्रियकर फरमान हा तिच्या भांगात सिंदूर (कुंकू) भरताना आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्रासारखा दिसणारा एक पवित्र धागा बांधताना या व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. हा संपूर्ण सोहळा तिथे उपस्थित असलेल्या अनेक लोकांच्या साक्षीनं पार पडला. संपूर्ण विवाह सोहळ्यादरम्यान, हे जोडपं अत्यंत आनंदात दिसून येत होतं.  

मोनालिसा आणि फरमानची भेट कुठे झाली? 

मीडिया रिपोर्टनुसार,  मोनालिसा ही मध्य प्रदेशातील इंदूरची रहिवासी आहे, तर तिचा पती फरमान हा महाराष्ट्राचा रहिवासी आहे. या दोघांचे गेल्या दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते. मात्र, दोघेही वेगवेगळ्या धर्मांचे असल्यानं मोनालिसाचे वडील जयसिंग भोसले यांच्याकडून त्यांना तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. तसेच, मोनालिसाच्या मनाविरुद्ध, एका दूरच्या नातेवाईकाशी लग्न करण्यासाठी त्यांनी तिच्यावर दबाव टाकल्याचा आरोपही केला जात आहे. आपल्या मुस्लिम प्रियकराशी लग्न केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मोनालिसा म्हणाली की, "माझ्या कुटुंबाची इच्छा होती की, मी खूप दूरच्या कोणाशी तरी लग्न करावं, पण मला ती कल्पना अजिबात आवडली नाही... मात्र आता, मी खूप आनंदी आहे..."

कुटुंबाच्या विरोधात जाऊन मोनालिसाचं मुस्लिम बॉयफ्रेंडशी लग्न 

मोनलिसा नुकतीच पूवर इथे तिच्या 'नागम्मा' या पहिल्या मल्याळम सिनेमाचं शुटिंग करत असतानाच अचानक एक बातमी समोर आली. मीडिया रिपोर्टनुसार, मोनालिसाच्या वडिलांनी तिला शोधून काढलं आणि जबरदस्तीनं मूळ गावी परत नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर, मोनालिसा आणि फरमान यांनी केरळची राजधानी असलेल्या शहरातील थंपानूर पोलीस ठाण्याला भेट दिली आणि पोलीस संरक्षणाची मागणी केली. औपचारिक तक्रार दाखल केल्यानंतर, तिच्या वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं. पोलिसांनी कुटुंबाला सांगितलं की, मोनालिसा 18 वर्षांची असल्यानं, तिला कोणासोबत राहायचंय, याचा निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार तिला आहे.

त्यानंतर, मोनालिसा आपल्या प्रियकरासोबत पोलीस ठाण्यातून बाहेर पडली आणि या जोडप्यानं तिथल्याच एका मंदिरात जाऊन आपली लग्नगाठ बांधली. केरळमधील अनेक प्रमुख राजकीय नेत्यांनी या जोडप्याला पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतला. यामध्ये राज्याचे शिक्षण मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांचाही समावेश होता, ज्यांनी या घटनेचं वर्णन 'True Kerala Story' असं केलं आहे. एम.व्ही. गोविंदन् (CPI(M) चे राज्य सचिव) आणि ए.ए. रहीम (खासदार) हे देखील यावेळी उपस्थित होते.

व्हायरल व्हिडिओमध्ये मोनालिसा एका कोर्टात असल्याचं दिसत असून, तिचा पती फरमान खान तिच्या बाजूला उभा आहे. या जोडप्यानं 'कोर्ट मॅरेज' केलं असून, त्यांच्या हातात त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट आहे. व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर मंत्रोच्चाराचा आवाज ऐकू येत आहे. नवविवाहित असल्याचा आनंद त्या दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. व्हिडीओमध्ये मोनालिसाने लाल रंगाची बनारसी साडी परिधान केल्याचं दिसतंय. त्यासोबतच, तिनं आपल्या भांगात कुंकू (सिंदूर) भरलंय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

व्हायरल गर्ल मोनालिसाने बांधली लगीनगाठ; वडिलांचा विरोध, लेक पोलिसात