Madhuri Dixit Lookalike Actress Life: 90 चे दशक अनेक अभिनेत्रींनी गाजवलं. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), जुही चावला, काजोल, करिश्मा कपूर, रविना टंडन यांनी आपल्या अदाकारांनी आणि अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ केलं. अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये फरहीन खान यांचंही नाव घेतलं जातं.  त्यांनी प्रत्येक सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाची छाप सोडली.  माधुरी दीक्षितसारखी हुबेहूब दिसणाऱ्या या अभिनेत्रीने  आपल्या कारकिर्दीत दिग्गज कलाकारांसोबत काम केलं होतं.  कमल हसन आणि अक्षय कुमार यांच्यासह अनेक बड्या कलाकारांसोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली होती.  मुख्य म्हणजे, त्यांनी शाहरुख खानचा (Shahrukh Khan) ब्लॉकबस्टर सिनेमा 'बाजीगर' हा सिनेमा नाकारला होता.  यानंतर फरहीन खान (Farheen Khan) यांच्या कारकि‍र्दीला ब्रेक लागला.  क्रिकेटपटूसोबत संसार थाटल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्राला राम राम केलं.

Continues below advertisement

शाहरुख खानचा 'बाजीगर' हा सिनेमा फरहीन खान यांनी का रिजेक्ट केला? (Farheen Khan Rejected Shah Rukh Khans Baazigar)

माहितीनुसार,  फरहीन खान यांनी 5 वर्षांच्या कारकि‍र्दीत  विविध जॉनरच्या सिनेमांमध्ये काम केलं.  यानंतर त्यांनी क्रिकेटर मनोज प्रभाकर यांच्यासोबत लग्न केलं.   तसेच फिल्मी दुनियेला राम राम केलं. 1992 साली त्यांनी 'जान तेरे नाम' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं.  या सिनेमातील गाणी प्रचंड हिट झाले होते.  अभिनेत्री रातोरात प्रकाशझोतात आली. रोनित रॉय यांनी त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.  फरहीन खान यांना, माधुरी दीक्षितप्रमाणे दिसते, असं म्हणायचे. त्यांना लूकअलाइक म्हणायचे. फरहीन खान यांनी आपल्या कारकि‍र्दीत केवळ हिंदी सिनेसृ्ष्टीत नाही तर,  कन्नड सिनेमांमध्येही काम केलं आहे.  1993 साली त्यांनी कमल हसन यांच्यासोबत फिल्म 'कलाइग्नन'मध्ये काम केलं होतं. 

फरहीन खान यांनी आपल्या कारकि‍र्दीत 'दिल की बाजी'  आणि 'सैनिक' या सिनेमात काम केलं होतं. 'नजर के सामने' या सिनेमात अभिनेत्री अक्षय कुमारसोबत रोमान्स करताना दिसली. फरहीन खान यांनी आपल्या कारकि‍र्दीत बड्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे.  ऋषि कपूर आणि जूही चावला यांची फिल्म 'साजन का घर' आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या 'अग्नि प्रेम' या सिनेमात काम केलं.  त्यांनी आपल्या सौंदर्यातून आणि अभिनयातून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.  फरहीन खान 'बाजीगर' या सिनेमातही दिसणार होती.  2014 साली 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत फरहीन यांनी खुलासा केला की, त्यांना अब्बास - मस्तान यांचा 'बाजीगर' या सिनेमाची ऑफर देण्यात आली होती.  यानंतर शिल्पा शेट्टीला ऑफर देण्यात आली होती.  1994 साली  फरहीन आणि भारतीय क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांची भेट  झाली.  दोघांनी लग्न केलं.  मनोज प्रभाकर विवाहित होते. 

Continues below advertisement

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Jackie Shroff on Mahesh Manjrekar: 'आता तो मला सिनेमात घेतच नाही'; महेश मांजरेकरांबद्दल जॅकी श्रॉफ काय म्हणाले? मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा केली व्यक्त