low budget movie : सायको थ्रिलर चित्रपटांचा क्रेझ प्रेक्षकांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून टिकून आहे. मोठ्या पडद्यापासून ते OTT पर्यंत अशा प्रकारच्या कंटेंटचा भडिमार पाहायला मिळत आहे. मात्र, काही मोजक्या चित्रपटांनाच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. इथे आम्ही तुम्हाला अशाच एका सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याने नुकताच 71 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आहे.

हा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट अतिशय कमी बजेटमध्ये तयार झाला आणि त्याने 6 पट जास्त कमाई केली. हा जरी सायकोलॉजिकल थ्रिलर असला, तरी यात कुठलाही खून नाही. अश्लील दृश्येसुद्धा नाहीत, पण दोन व्यक्तींची अशी एक सनक दाखवली आहे की ते एकमेकांना संपवण्यावर उतरणारे असतात. क्लायमॅक्सपर्यंत तुम्हाला नायक-खलनायक कोण हे ओळखणे देखील कठीण होईल.

71 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणाऱ्या या सायकोलॉजिकल थ्रिलरचे नाव आहे ‘पार्किंग’. या चित्रपटाला सर्वोत्तम तमिळ चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तसेच यात महत्त्वाची भूमिका करणाऱ्या मुथुपेट्टई सोमू भास्कर यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

एम. एस. भास्कर यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर चाहत्यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, हा दिवस ते कधीच विसरणार नाहीत. त्यांनी म्हटले की, चित्रपटाने दाखवले की कशा प्रकारे एका छोट्याशा भांडणाचे मोठे परिणाम होतात. या चित्रपटाने माझ्या अभिनयाला नवी ओळख दिली.

एम. एस. भास्कर पुढे म्हणाले, “हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. ‘पार्किंग’ चित्रपटात अभिनय करणे हा माझ्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा होता. माझ्या अभिनयासाठी चाहत्यांकडून मिळालेले प्रेम आणि आता मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार यामुळे माझे मन भरून आले आहे.”

‘पार्किंग’मध्ये एम. एस. भास्कर यांच्यासोबत हरीश कल्याण आणि इंदुजा रविचंद्रन यांसारखे प्रतिभावान कलाकार आहेत. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 6 पट जास्त कमाई केली. हा 3 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला आणि बॉक्स ऑफिसवर 17 कोटी रुपयांचे उत्पन्न केले. इतकेच नव्हे तर, OTT वर रिलीज झाल्यावरही या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाला.

‘पार्किंग’ला IMDb वर 7.8 अशी रेटिंग मिळाली आहे. हा मूळतः तमिळ भाषेत तयार झाला असून हिंदी, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये OTT प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar वर पाहता येतो. चित्रपट सुरू झाल्यापासून तुमची नजर त्यावरून हटणार नाही. तो तुम्हाला क्लायमॅक्सपर्यंत खिळवून ठेवतो.

‘पार्किंग’ची कथा एका घरात राहणाऱ्या दोन भाडेकरूंवर आधारित आहे. खाली राहणाऱ्या भाडेकरूकडे स्कूटर असते, तर वर राहणाऱ्या भाडेकरूकडे कार असते. दोघांमध्ये आपापली गाडी पार्क करण्यासाठी स्पर्धा सुरू होते.

सुरुवातीला पार्किंगवरून सुरू झालेला वाद वाढत जातो. पार्किंगसाठी दोघे आपापल्या ऑफिसलाही जात नाहीत आणि आधी गाडी पार्क करण्याच्या स्पर्धेत एकमेकांशी भिडतात. ते एकमेकांच्या गाड्या फोडतात आणि हळूहळू या भांडणात एकमेकांच्या कुटुंबीयांनाही ओढतात. चित्रपटाचा क्लायमॅक्स प्रेक्षकांना स्तब्ध करून टाकतो.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

स्मृती ईराणी बनल्या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या टिव्ही अभिनेत्री, एका एपिसोडसाठी किती पैसे घेतात?