Director Quentin Tarantino And Family Killed In Iranian Airstrike: इराण (Iran), इस्रायल (Israel) आणि अमेरिका (United States) यांच्यातील युद्धामुळे पश्चिम आशियात तणाव वाढतोय. त्यामुळे संपूर्ण जग चिंतेत बुडालंय. दुबईसह (Dubai) संपूर्ण युएईमधून हल्ल्यांच्या बातम्या सतत येत आहेत. एकीकडे युद्धामुळे जगभरातील तणाव वाढतोय, तर दुसरीकडे सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ आणि दावे समोर येत आहेत. सोशल मीडियावरच्या अशाच एका दाव्यानं सर्वांची चिंता वाढली आहे. दिग्गज निर्माते क्वेंटिन टारांटिनो यांचं निधन झाल्याचं वृत्त सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 'पल्प फिक्शन' आणि 'किल बिल' यांसारख्या सिनेमांसाठी प्रसिद्ध असलेले हॉलिवूडचे जगप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक क्वेंटिन टारांटिनो यांच्या निधनाच्या वृत्तानं खळबळ माजली आहे. अनेक चाहत्यांना तर धक्काच बसला आहे
हॉलिवूडच्या लेजेंडरी फिल्ममेकर्सपैकी एक असलेले क्वेंटिन टारांटिनो यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा इराणच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचं बोललं जातंय. पण, त्यांच्या मृत्यूचं वृत्त पूर्णपणे खोटं असून या निव्वळ अफवा आहेत. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यानुसार, ऑस्कर विजेता दिग्दर्शक आणि त्यांचे कुटुंब इस्रायलवर झालेल्या इराणी हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडले. 62 वर्षीय टारांटिनो बहुतेक वेळा त्यांच्या कुटुंबासह इस्रायलमध्ये असतात. हा दावा दिग्दर्शकाच्या निकटवर्तीयांनी फेटाळून लावला आहे.
इराणच्या हल्ल्यात दिग्दर्शकाचा मृत्यू?
सोमवार, 2 मार्च रोजी, 100K हून अधिक फॉलोअर्स असलेल्या अकाउंटने दावा केला की चित्रपट निर्माते क्वेंटिन टारांटिनो, त्यांची पत्नी डॅनिएला पिक आणि त्यांची मुलं इराणनं इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्रात मारली गेली. पोस्टमध्ये ही माहिती डेडलाइनला देण्यात आल्याचं सांगितलं. त्यात टारांटिनो इस्रायलमधील बॉम्ब शेल्टरमध्ये आश्रय घेत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील दाखवण्यात आले. वेगवेगळ्या पोस्टमध्ये दावा करण्यात आला की, हा शेल्टर तेल अवीव किंवा जेरुसलेममध्ये आहे.
व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षादरम्यान दिग्दर्शकाचा क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्यू झाला. दरम्यान, या वृत्तांमध्ये कोणतंही तथ्य नाही. यासंदर्भात शेअर केले जाणारे फोटो आणि व्हिडीओ देखील एआय वापरून तयार केले आहेत.
डेडलाइननं आता ही पोस्ट कॉल आउट केली आहे, ज्यामध्ये असं म्हटलंय की, क्वेंटिन टारांटिनो यांच्या मृत्यूची बातमी चुकून त्यांच्या नावानं देण्यात आली होती. त्यांनी कधीही असा अहवाल प्रकाशित केलेला नाही. टीएमझेडनं स्पष्ट केलं आहे की, ही पोस्ट खोटी आहे. क्वेंटिनच्या जवळच्या एका सूत्रानं प्रकाशनाला सांगितलं की, "क्वेंटिन जिवंत आहे आणि सुखरूप आहेत, त्यांचं कुटुंब पूर्णपणे सुरक्षित आहे..."
अमेरिका आणि इस्त्रायलनं हल्ले केल्यानंतर आता इराणनं प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला त्यांनी आखातातील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यात युएई, कतार आणि इतर अनेक शेजारी देशांना लक्ष्य केले गेले. सोमवारी त्यांनी इस्रायलवरच हवाई हल्ले केले आणि दावा केला की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे त्यांचे लक्ष्य होते.
कोण आहेत क्वेंटिन टारांटिनो?
क्वेंटिन टारांटिनो हे त्यांच्या पिढीतील सर्वात प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहेत. ते 'किल बिल', 'रिझर्व्हॉयर डॉग्स' आणि 'इंग्लोरियस बास्टर्ड्स' सारख्या कल्ट क्लासिक्ससाठी ओळखले जातात. 62 वर्षीय दिग्दर्शकाला दोन अकादमी पुरस्कार, दोन बाफ्टा पुरस्कार आणि चार गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत. 2018 मध्ये, टारँटिनोने इस्रायली गायिका डॅनिएला पिकशी लग्न केले. 2009 मध्ये 'इंग्लोरियस बास्टर्ड्स' सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान दोघांची भेट झाली. या जोडप्याला दोन मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. 2020 पासून, कुटुंब त्यांचा वेळ तेल अवीव आणि लॉस एंजेलिसमध्ये विभागत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
