Leena Bhagwat Share Photo From Hospital: 'आवाजावर ताण यायला सुरुवात झाली अन्...'; मराठी अभिनेत्रीचा रुग्णालयातला फोटो समोर, पोस्ट करत सांगितलं, 'काहीच बोलता येणार नाही...'
Leena Bhagwat Share Photo From Hospital: प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असतानाच अभिनेत्री लीना भागवत यांनी 'आमने सामने' नाटकातून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे.

Leena Bhagwat Share Photo From Hospital: मराठी अभिनेत्री (Marathi Actress) लीना भागवत (Leena Bhagwat), मराठी मनोरंजनसृष्टीतील (Entertainment World) लोकप्रिय अभिनेत्री (Actress) आणि लेखिका. रंगभूमी, मराठी चित्रपट (Marathi Movie) आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्याची क्षमता आणि सहजसुंदर अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. लीना भागवत सध्या अभिनेते मंगेश कदम यांच्यासोबत 'आमने सामने' नाटकात झळकतायत. या नाटकाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. नाटकाचे शो हाऊसफुल्ल होत असल्याचं दिसतंय. पण, रसिक-प्रेक्षकांना लीना भागवत यांची लेटेस्ट पोस्ट पाहून धक्का बसला आहे. प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असतानाच अभिनेत्री लीना भागवत यांनी 'आमने सामने' नाटकातून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे.
नाटक गाजत असतानाही अभिनेत्रीनं असं अचानक नाटकातून ब्रेक घेतल्याचं ऐकून चाहत्यांना धक्का बसलेला. पण, त्याच पोस्टमध्ये अभिनेत्रीनं ब्रेक घेण्याचं कारणंही स्पष्ट केलंय. खरं तर प्रकृतीच्या कारणामुळे लीना भागवत यांनी नाटकातून ब्रेक घेतलाय. लीना भागवत यांची शस्त्रक्रिया झाली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन लीना यांनी महत्वाची अपडेट चाहत्यांना दिली आहे. आवाजावर ताण आल्यानं लीना यांनी काही दिवस ब्रेक घेण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलंय, असं सांगितलंय.
View this post on Instagram
लीना भागवत यांची सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हणाल्या?
लीना भागवत पोस्ट करत म्हणाल्यात की, "मेरी आवाज ही पेहचान है.... आता पुढचे काही दिवस “कसं वाटलं नाटक?” असं म्हणता येणार नाही. हेच कशाला काहीच बोलता येणार नाही. गेले काही दिवस फक्त एकच गाणं आठवतंय मेरी आवाज ही पेहचान है.... एका कलाकारासाठी त्याचा आवाज हीच खरी त्याची ताकद असते. मागच्या वर्षीपासून आमने सामनेचे प्रयोग लागोपाठ housefull जातायत. प्रयोग बघताना जेवढी मजा तुम्हाला येते तेवढीच आम्ही कलाकार सुद्धा करतो..."
"आमने सामने मधल्या माझ्या पात्राला दिलेलं प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही. पण गेले काही महिने आवाजावर ताण यायला सुरुवात झाली होती. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग करू लागले पण शेवटी डॉक्टरांनी सक्त ताकीद दिली..."
"पेहचान टिकवायची असेल तर एक छोटी Procedure करावीच लागेल. आणि अखेर काल ती procedure पार पडली. डॉक्टर त्यांची संपूर्ण टीम, मंगेश, नाटकाची टीम पूर्ण वेळ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आता काही दिवस आवाजाला विश्रांती देतेय. थोड्या दिवसांनी अजून ताकदीने उभी राहीन आणि पुन्हा म्हणेन “कसं वाटलं नाटक?”... तोपर्यंत एक छोटासा मध्यांतर... लवकरच भेटू आमने सामने!'', अशी पोस्ट लिहून लीना भागवत यांनी चाहत्यांना ही माहिती सांगितली. लीना यांची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिलाय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















