Lavani dance video : महाराष्ट्राच्या लोकपरंपरेत लावणीला खास स्थान आहे. (Lavani dance video) गावोगावच्या जत्रा, तमाशा आणि विविध सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये लावणीच्या ठेक्यावर प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध होतात. (Lavani dance video) आजही ढोलकीच्या तालावर सादर होणाऱ्या या कलेची लोकप्रियता कायम आहे. (Lavani dance video) नृत्यकौशल्याबरोबरच चेहऱ्यावरील हावभाव, अंगभूत अदाकारी आणि लय यांची सांगड घालणं हेच लावणीचं वैशिष्ट्य. त्यामुळेच सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ समोर येतात, मात्र त्यातील फार थोडेच लोकांच्या मनात घर करतात. सध्या इन्स्टाग्रामवर एका महिलेचा लावणी डान्स तुफान व्हायरल झालाय. लोकांनी तिच्या लावणी डान्सचं कौतुक केलंय.  (Lavani dance video)

महिलेचा लावणी डान्स इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल 

इन्स्टाग्रामवर रोज कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. सध्या एका महिलेचा लावणी डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक महिलने पारंपरिक वेशभूषेत दिसते. पायात घुंगरु बांधून  ढोलकीच्या तालवर लावणी  सादर करत आहे. तिच्या प्रत्येक हालचालीतली लयबद्धता, चेहऱ्यावरचे मोहक हावभाव आणि सहजता पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. साधं पार्श्वभूमी असूनही तिच्या अदाकारीमुळे संपूर्ण सादरीकरण लक्षवेधी ठरलं आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @suvarnakale333 या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. काही तासांतच लाखो प्रेक्षकांनी तो पाहिला असून, हजारोंच्या संख्येनं लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. एका युजरनं प्रतिक्रिया दिली – “यालाच खरी लावणी म्हणतात,” तर दुसऱ्याने लिहिलं, “अप्रतिम ठेका… मन जिंकून गेलं.” अनेकांनी या कलेला प्रोत्साहन देण्याची गरजही व्यक्त केली आहे.

लावणी ही केवळ मनोरंजनाची कला नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करते. सोशल मीडियावरून या कलेला मिळणारा प्रतिसाद पाहून असं म्हणता येईल की, आजच्या नव्या पिढीलाही लावणी तितकीच भावते. या महिलेनं सादर केलेला लावणीचा ठेका त्याचं उत्तम उदाहरण ठरला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

South Cinema Actress Struggle Life: ना नयनतारा, ना सामंथा, ना अनुष्का... सर्वांच्या मागून येऊन साध्यासुध्या अभिनेत्रीनं दिली 100 कोटींची हिट फिल्म

Supernatural Psychological Horror Film Vash Level 2: स्वतःवर अजिबात राहत नाही ताबा, एवढा भारी आहे, 'या' सुपरहिट सिनेमाचा सीक्वल; कुठे पाहता येईल?