Lara Dutta Shares Shocking Story: शुटिंगवेळी बऱ्याचदा स्टार्स असो किंवा ज्युनिअर कलाकार, अनेकदा त्यांना कोणत्या न कोणत्या  दुर्देवी घटनेला सामोरे जावे लागते.   असे अनेक किस्से कलाकार शेअर करत असतात. अलिकडेच मिस युनिव्हर्स लारा दत्ताने शुटिंग वेळेस घडलेला एक किस्सा शेअर केला.  लारा दत्ता एकदा मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावली होती. लारानं आपल्या आतापर्यंतच्या कारकि‍र्दीत   ग्लॅमरस, कॉमिक, लव्ह स्टोरी आणि अॅक्शन चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. मात्र, तिच्या आयुष्यातील एक किस्सा, फिल्मी स्टोरीपेक्षा काही कमी नाही.  तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणारा खरा हिरो दुसरा - तिसरा कुणी नसून, अक्षय कुमार आहे. नेमका किस्सा काय?  जाणून घेऊयात.

Continues below advertisement

लारानं अलिकडेच शुटिंग दरम्यानचा किस्सा शेअर केला आहे. लारा दत्ता समुद्राच्या किनाऱ्यावर शुट करत होती. यादरम्यान, तिला मोठ्या लाटेने समुद्रात ओढून नेले होते.  त्यावेळेस तिचा सहकलाकार अक्षक कुमार तिथे उपस्थित होता. त्याने तिला वाचवले, अशी माहिती तिने दिली. तिच्यासोबत ही भयंकर घटना 'अंदाज' या चित्रपटाच्या सेटवर घडली. एका मुलाखतीत तिनं ही माहिती दिली.  तसेच जुने शुटिंगदरम्यानचे किस्से शेअर केले.

2000 साली लारा दत्ताला विश्व सुंदरीचा किताब मिळाला होता.  2003 साली तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अंदाज या चित्रपटातून तिनं सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.  दरम्यान, मुलाखतीत तिने डान्स सीन शुट करत असताना नेमकं काय घडलं होतं? याची माहिती दिली. पहिल्याच चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान, तिच्यासोबत भयंकर घडलं.  'मी पाण्यात गेली. शुटसाठी मी लेदरचे कपडे घातले होते.  मला पोहताही येत नव्हतं. एका दगडाप्रमाणे मी समुद्रात आत गेले', असं लारा म्हणाली. 

Continues below advertisement

'जर तेव्हा अक्षय कुमार  तिथे उपस्थित नसता तर, हा अपघात आणखी गंभीर झाला असता. अक्षयने तातडीने पाण्यात उडी घेतली. तसेच पकडून किनाऱ्यावर आणले. त्यानंतर मला हायपोथर्मिक शॉक बसला.  शुटिंग तात्काळ थांबवण्यात आली.  तातडीने मला रुग्णालयात नेण्यात आले होते',  असं लारा मुलाखतीत म्हणाली.  या घटनेचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला',  असं लारा म्हणाली. 

'जेव्हा अक्षय कुमारने ब्लू चित्रपटासाठी मला विचारलं, तेव्हा पाण्यात शुटिंग करावं लागेल, असं सांगितलं, तेव्हा मी हा चित्रपट करण्यास नकार दिला.  तेव्हा अक्षयने मला सरळ  पोहायला शिक, असं सांगितलं.  तेव्हा लाराने, 'तिशीत असताना मला सांगितलं होतं की, डायव्हिंग शिकून घे.  मला वाटलं मी वेडी झाली आहे. परंतु, भीतीवर मात करत मी तिशीत पोहायला शिकले, तसेच ब्लू हा सिनेमा साइन केला', असं लारा म्हणाली.