Lara Dutta reaction to Iran Israel tension in Dubai: विश्व सुंदरी अन् बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता सध्या दुबईमध्ये आहे. युद्धजन्य परिस्थितीबाबत तिनं अनुभव शेअर केला आहे. सध्या ती आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी दुबईमध्ये असल्याची माहिती आहे. दरम्यान, इराण आणि इस्त्रायलमधील युद्धजन्य स्थितीचा थेट परिणाम दुबईमध्ये जाणवला आहे. लारानं तेथील परिस्थितीबाबतची माहिती चाहत्यांना दिली. लारानं स्पष्ट केलं की, गेल्या काही दिवसांपासून दुबईमधील वातावरण तणावपूर्ण आणि भयावह होते. दरम्यान, परिस्थिती चिघळलेली असली तरी, तिनं दुबई प्रशासनाचे उघडपणे कौतुक केले आहे. तिनं इन्स्टाग्रामवर याचा व्हिडिओही शेअर केला आहे.
28 फेब्रुवारी रोजी अभिनेत्री दुबईमध्ये आपल्या शुटिंगमध्ये व्यस्त होती. अचानक तिला आकाशातून मोठ्या स्फोटचा आवाज आला. तिनं आकाशात क्षेपणास्त्रे पाहिली. जे चित्रपटातील दृश्याप्रमाणे होते. परंतु, खूप भयावह होते, असं अभिनेत्रीनं सांगितलं. लारा दत्ताने स्पष्ट केले की, लढाऊ विमानांचा आवाज इतका मोठा होता की, तिच्या घराच्या खिडक्या आणि दरवाजेही थरुथरु लागले होते, असं लारानं सांगितलं.
भयावह वातावरण असूनही, लारा दत्तानं एक सकारात्मक मु्द्दाही मांडला. दुबईमध्ये तिला कधीही असुरक्षित वाटले नाही, असं लारा म्हणाली. तिनं यावेळी युएई सरकारचंही कौतुक केलं. तिनं सांगितलं की, प्रशासन आपल्या नागरिकांची आणि परदेशी लोकांची खूप काळजी घेत आहे, असं म्हणत तिनं युएई प्रशासनाचं कौतुक केलं. लारानं सांगितलं की, प्रशासन आपल्या नागरिकांची आणि परदेशी लोकांची खूप काळजी घेत आहे. इतक्या मोठ्या संकटानंतरही दुबईचा वेग मंदावलेला नाही, ही गोष्ट पाहून लारा प्रभावित झाली आहे.
लारानं यावेळी दुबईतील सामान्य लोकांच्या धाडसाचेही कौतुक केलं आहे. 'या काळात तेथील लोक ज्यापद्धतीनं एकमेकांना पाठिंबा देत आहेत. घाबरुन न जाता त्यांचे काम करत आहेत, हे खरोखरच कौतुकास्पद आहे', असं अभिनेत्रीनं स्पष्ट केलं. लारा दत्ताला आता लवकरच मुंबईला जायचं आहे. तिनं घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. लारानं यावेळी शांततेचे महत्त्व, एक मजबूत प्रशासन, एकजूट समाज, हे मिळून कसे मोठ्या आव्हानांना तोंड देऊ शकते, हा संदेश तिनं व्हिडिओतून दिला आहे.