Lara Dutta father passes away : बॉलीवूड अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutta father passes away) हिचे वडील एल. के. दत्ता यांचे निधन झाले आहे. ते वायूदला विंग कमांडर होते. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. लारा दत्ताने आपल्या टेनिस स्टार  पती महेश भूपती याच्यासमवेत वडिलांचे अंत्यसंस्कार केले. या वेळी लारा दत्ताला (Lara Dutta father passes away) रडू कोसळलेलं पाहायला मिळालं. चाहते केवळ लाराच्या (Lara Dutta father passes away) वडिलांना श्रद्धांजली अर्पण करत नाहीत, तर या कठीण प्रसंगी लाराला धीर देत आहेत. अनेक लोक सोशल मीडियावर आपल्या संवेदना व्यक्त करत आहेत.

लारा दत्ता यांचे वडील भारतीय वायुसेनेत विंग कमांडर या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या सेवेबद्दल आणि समर्पणाबद्दल लोक त्यांना आदरांजली अर्पण करत आहेत. 12 मे रोजी लाराने आपल्या वडिलांचा वाढदिवस साजरा केला होता. ही तारीख लारासाठी विशेष महत्त्वाची आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून सांगितले होते की, 12 मे ही तारीख तिच्या आयुष्यातील दोन अत्यंत खास क्षणांशी संबंधित आहे – कारण या दिवशी तिला ‘मिस युनिव्हर्स’चा किताब मिळाला होता आणि हाच तिच्या वडिलांचा जन्मदिवस सुद्धा आहे.

12 मे रोजी साजरा केला होता वडिलांचा वाढदिवस

इंस्टाग्रामवर काही छायाचित्रे शेअर करत लाराने कॅप्शनमध्ये लिहिले होते – "काल भावनांनी भरलेला दिवस होता. 12 मे… माझ्या आयुष्यातील एक खूपच महत्त्वाचा दिवस! केवळ माझ्या वडिलांचा वाढदिवस नाही, तर आजपासून 25 वर्षांपूर्वी याच दिवशी मी ‘मिस युनिव्हर्स’ बनले होते! काळ खूप वेगाने पुढे जातो. काल मी वडिलांच्या वाढदिवसानिमित्त पूजा केली. मला हे ठाऊक आहे की हे जीवन फार कठीण आहे, त्यामुळे विश्वाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीस आनंदाने स्वीकारणे आणि त्याबद्दल कृतज्ञ असणे गरजेचे आहे. गेल्या 25 वर्षांपासून मिळालेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद."

कामाच्या बाबतीत सांगायचे तर लारा लवकरच 'वेलकम' या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात – वेलकम टू द जंगल – दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार, दिशा पाटणी, रवीना टंडन, फरदीन खान आणि इतर काही कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

आंतरविभागीय खात्यांतर्गत 53 व्या नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न; 'कायप्पाचा पाडा' ठरले सर्वोत्कृष्ट नाटक