Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘झी मराठी’वरच्या (Zee Marathi) गाजलेल्या मालिकेत आता सात वर्षांचा लीप येणार आहे. तर, मालिकेचं कथानक संपूर्ण बदलून जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. अनेकांना मालिकेत अचानक भयानक घेण्यात येत असलेला सात वर्षांचा लीप पटेनासा झालाय. तर, मालिकेतल्या कथानकाच अचानक झालेले बदल अनेक प्रेक्षकांना मान्य नाहीत. मालिकेत भला मोठा लीप घेतल्यानंतर मालिकेतील मुख्य अभिनेते तुषार दळवी एक्झिट घेणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक अजून निराश झाले आहेत. अनेकांनी तर सोशल मीडियावर वाहिनीला जाब विचारायला सुरुवात केली आहे. तर, अनेकांनी ‘लक्ष्मी निवास’मधील (Lakshmi Nivas Serial) निवासच नसेल, तर काय पाहायचं? असा उलट प्रश्नच विचारला आहे.
‘झी मराठी’वर ‘लक्ष्मी निवास’ मालिका (Lakshmi Nivas Zee Marathi Serial) गेल्या काही दिवसांपासून दुपारच्या वेळेत दाखवली जातेय. आता मालिकेच्या कथानकात मोठे बदल करण्यात येणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भावना-सिद्धू यांच्या नात्यात दुरावा आलाय, तर जान्हवीनं आपाल नव्यानं संसार थाटलाय. तिनं विश्वासोबत लग्न केलं असून दोघांना गोंडस मुलगाही दाखवण्यात आलाय. पण, सर्वात धक्कादायक बदल म्हणजे, मालिकेचे मुख्य अभिनेते आता दिसणार नाहीत. त्यांची एक्झिट झाली असून आता ते कथानकाचा भाग नसणार आहेत.
‘झी मराठी’कडून प्रोमो शेअर (Zee Marathi Lakshmi Nivas Serial Promo)
‘झी मराठी’नं ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोमध्ये सगळंच बदललेलं पहायला मिळतंय. प्रोमोमध्ये दळवी कुटुंबाची परिस्थिती आता पूर्णपणे बदलली असून लक्ष्मी यशस्वी उद्योजिका झाली आहे. तर, मुख्य अभिनेते श्रीनिवास यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांची स्वप्न आता लक्ष्मी मुलांच्या साथीनं पूर्ण करताना दिसणार आहे.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या प्रोमोमध्ये श्रीनिवास हे पात्र आता कथानकाचा भाग नसणार आहे. त्यामुळे मालिकेतून अभिनेते तुषार दळवी यांची एक्झिट झाली आहे. तर, दुसरीकडे जयंत जेलमध्ये गेल्यानंतर जान्हवी आपला नवा संसार थाटते आणि विश्वासोबत लग्न करते. दोघांना एक मुलगा आहे. पण, आता दळवी कुटुंबाच्या आयुष्यात वादळ येणार आहे. 7 वर्षांचा कारावास भोगल्यानंतर जयंत बदला घेण्यासाठी परत येणार आहे.
तर, भावना आणि सिद्धू यांच्यात दुरावा येतो आणि यामुळेच भावना आणि लक्ष्मी यांच्या नात्यातलं अंतर वाढतं. सिद्धूसोबतच्या नात्यातल्या वाढत्या तणावाला भावना लक्ष्मीला जबाबदार मानते.
दरम्यान, आता लक्ष्मी कुटुंबाची विस्कटलेली घडी कशी बसवणार? आणि सुडानं पेटलेल्या जयंतपासून दळवी कुटुंबाचं रक्षण कसं करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
