एक्स्प्लोर

Lagli Paij Marathi Theatre Play: छोट्या पडद्यावरचा चार्मिंग बॉय, रुमानी खरे सांगणार तरुणाईंच्या नात्याची गोष्ट; व्यावसायिक नाटकातून रंगभूमीवर पदार्पण

Lagli Paij Marathi Theatre Play: आजच्या काळातल्या तरुणाईंच्या नात्याची गोष्ट सांगणारे 'लागली पैज?' नाटकातून रुमानी खरे आणि यशोमन आपटे झळकणार एकत्र.

Lagli Paij Marathi Theatre Play: मराठी व्यावसायिक रंगभूमीवर (Marathi professional Theatre) सध्या उत्तमोत्तम नाटके (Theatre Play) येत आहेत. या नाटकांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. त्यात आता 'लागली पैज?' या नव्याकोऱ्या नाटकाची भर पडणार आहे. मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून या नाटकाची सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली आहे. आजवर अनेक मालिकांमधून घराघरात पोहचलेला चार्मिंग बॉय, तरुणाईचा आवडता चेहरा अर्थात अभिनेता यशोमन आपटे (Yashoman Apte) या नाटकात प्रमुख भूमिका साकारत असून अभिनेत्री रुमानी खरे (Roomani Khare) या नाटकातून व्यावसायिक नाट्य रंगभूमीवर पदार्पण करत आहे. 21 नोव्हेंबरला दुपारी चार वाजता दीनानाथ नाट्यगृहात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे.

प्रभात थिएटर्सने निर्मिती केलेल्या 'लागली पैज?' या नाटकाचे निर्माते श्रीमती ज्योती कठापूरकर आणि निखिल करंडे आहेत, तर  ज्योती पाटील, प्रियांका बिष्ट, रूपा करोसिया आणि मनोज मोटे हे सहनिर्माते आहेत. नाटकाचे लेखन हर्षद प्रमोद कठापूरकर यांचे असून अंकुर अरुण काकतकर दिग्दर्शित या नाटकात यशोमान आपटे, रुमानी खरे यांच्यासह सुप्रिया विनोद, शंतनू अंबाडेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. बऱ्याच वर्षांनंतर संदीप खरे यांनी नाटकासाठी गाणी लिहिली असून  त्यांनी लिहिलेल्या गीतांना साई-पियुष यांनी संगीत दिले आहे तर संतोष शिदम हे सूत्रधार आहेत. 

'लागली पैज?' आजच्या तरुणाईच्या नात्याची गोष्ट सांगते.गीतकार संदीप खरे यांची कन्या रुमानीनं आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. मात्र, आता "लागली पैज?" या नाटकातून रुमानी खरे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहे. नात्यामध्ये प्रेम आणि महत्वाकांक्षा ह्यांमध्ये जेव्हा निवड करण्याची वेळ येते तेव्हा निर्माण होणारी भावनिक गुंतागुंत  यावर या  नाटकाचे कथानक बेतले आहे. आदित्य आणि रेवा या जोडप्यात रेवाला सतत पैज लावण्याची सवय असते. अशावेळी दोघंजण नातं टिकवून ठेवण्याची पैज लावतात, मग त्यांच्या नात्याचं काय होतं, या प्रश्नाचं उत्तर नाटक पाहिल्यावरच मिळणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog: मुंबईच्या बीडीडी चाळीतील वृद्ध डिजिटल अरेस्टचा बळी, 75 लाख गमावले
Maharashtra Live blog: मुंबईच्या बीडीडी चाळीतील वृद्ध डिजिटल अरेस्टचा बळी, 75 लाख गमावले
कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Asia Cup : आशिया कप ट्रॉफीसाठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, आयसीसीच्या बैठकीत मुद्दा मांडला, अखेर काय ठरलं?
आशिया कप साठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, ICC च्या बैठकीत मुद्दा मांडला, काय घडलं? 
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pawar Land Scam: 'माझा त्या गोष्टीशी संबंध नाही', जमीन घोटाळ्यावर Ajit Pawar यांचे स्पष्टीकरण
Pune Land Scam: 'कोणीही दोषी आढळला तरी कारवाई होईल', मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट इशारा
Pune Land Scam: '…या प्रकरणी कारवाई केली जाईल', पोलीस आयुक्त Amitesh Kumar यांचा इशारा
Parth Pawar Land Scam:: रद्द केला व्यवहार, वाचणार पार्थ पवार? Special Report
Lonar Lake : लोणारच्या खाऱ्या पाण्यात चक्क मासे, पर्यावरणाला मोठा धोका Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog: मुंबईच्या बीडीडी चाळीतील वृद्ध डिजिटल अरेस्टचा बळी, 75 लाख गमावले
Maharashtra Live blog: मुंबईच्या बीडीडी चाळीतील वृद्ध डिजिटल अरेस्टचा बळी, 75 लाख गमावले
कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Asia Cup : आशिया कप ट्रॉफीसाठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, आयसीसीच्या बैठकीत मुद्दा मांडला, अखेर काय ठरलं?
आशिया कप साठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, ICC च्या बैठकीत मुद्दा मांडला, काय घडलं? 
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार
मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार
Embed widget